Tue, May 26, 2020 15:33होमपेज › Nashik › माउली मल्टिस्टेट फसवणूक; सुनील आडके यांना अटक

माउली मल्टिस्टेट फसवणूक; सुनील आडके यांना अटक

Last Updated: Feb 18 2020 1:51AM
नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यासह राज्यात व्याप्ती असलेल्या श्री माउली मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटी प्रा. लि. फसवणूक प्रकरणी नाशिकरोड-देवळाली व्यापारी बँकेचे संचालक तथा भाजपा पदाधिकारी सुनील खंडेराव आडके यांना सोमवारी (दि.17) आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.  

गेल्या आठवड्यात जादा परतव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या माउली सोसायटीच्या मुख्य संचालक विष्णू रामचंद्र भागवतला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. तपासात भागवत यांनी  सुनील आडकेमार्फत जमिनी खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. त्या आधारे सहायक पोलीस आयुक्त शेख यांनी संशयित आडके यांना अटक केली. दरम्यान, माउली मल्टिस्टेट व उज्ज्वलम अ‍ॅग्रो मल्टिस्टेट सोसायटीच्या गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असल्यास संपर्क साधवा. तसेच जादा परताव्याचे आमिष दाखवून भूलथापा देणार्‍या तसेच विविध सराफ व्यावसायिकांकडून चालविण्यात येणार्‍या मासिक बचत योजनांच्या परताव्याच्या आमिषास बळी न पडण्याचे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आले आहे.