Thu, Jan 28, 2021 21:30शहीद जवान यश देशमुख यांचे पार्थिव नाशिकमध्ये दाखल, उद्या मूळ गावी अंत्यसंस्कार

Last Updated: Nov 27 2020 9:44PM
चाळीसगाव/ जळगाव : पुढारी वृत्तसेवा

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील २१ वर्षाचे जवान देशाचे रक्षण करताना शहीद झाले. यश देशमुख असे या जवानाचे नाव आहे. त्यांचे पार्थिव आज सायंकाळी 5.30 वाजता नाशिक येथे पोहोचले. 

लष्कराची गार्ड टीम ऊद्या सकाळी 6 वाजता त्यांचे पार्थिव घेऊन नाशिक येथून निघणार आहे. त्यांचे पार्थिव सकाळी 8.30 वाजता पिंपळगाव येथे पोहोचणार आहे. त्यानंतर अंदाजे 10 वाजेदरम्यान त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे भुसावळ येथील कर्नल करूण ओहरी यांनी सांगितले.

यश दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाल्याची बातमी गावात धडकताच गावकऱ्यांचा काळजाचा ठोकाच चुकला. आताशी कुठे जीवनाची सुरूवात करणाऱ्या आणि देश सेवेचे मोठे स्वप्न घेऊन काश्मिरमध्ये तैनात असलेल्या यशचे असे अचानक जाण्याने गावकरी सुन्न झाले आहेत. संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे.