Sun, Sep 27, 2020 02:09होमपेज › Nashik › नाशिक : सप्तश्रृंगीच्या चरणी मंत्री अनिल परब यांचे साकडे

नाशिक : सप्तश्रृंगीच्या चरणी मंत्री अनिल परब यांचे साकडे

Last Updated: Feb 15 2020 11:24AM

महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना निवेदन देताना ग्रामस्थसप्तश्रृंगी (नाशिक) : प्रतिनिधी

उत्तर महाराष्ट्राचे कूलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तश्रृंगी गडावर आज महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब हे पहाटेच्या सुमारास गडावरील आई भगवतीच्या चरणी काकड आरती करून नतमस्तक झाले. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे याच्या हातून महाराष्ट्रातील जनतेचे कामे होऊ दे. माझ्याकडून जनतेचे कामे घडू दे. सर्वांना सुख शांती लाभो. पाच वर्षे जनतेची सेवा करण्याची शक्ती मुख्यमंत्री यांना देवी देवो, असे साकडे त्यांनी आई भगवतीकडे  घातले.

यावेळेस सप्तश्रृंगी गडावर येणारे भाविकभक्त आणि प्रवाशांसाठी बसस्थानक नसल्याने सप्तश्रृंगी गडावरील ग्रामस्थांनी शिवालय तलावाकडील जागेत अत्याधुनिक बसस्थान बांधावे याचे निवेदन त्याच्याकडे दिले. यानंतर ग्रामस्थांची आणि भाविकभक्ताची भावना लक्षात घेवून सदर बसस्थानकाचे काम येत्या दोन महिन्यांत मार्गी लावण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ग्रामस्थांना दिले. 

वाचा : कोल्हापूर : कसबा सांगावमध्ये घरगुती गॅसचा स्फोट, लहान मुलासह दोन जखमी

तसेच यावेळी ग्रामस्थांनी येथील परिस्थितीची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांना दिली. यावेळेस ग्रामस्थ प्रकाश कडवे, प्रदीप कदम,  राजेंद्र वाघ, रमेश पवार, धनेश गायकवाड, महेश पाटील (शहरप्रमुख शिवसेना), माजी उपसरपंच संदिप बेनके, राजेश गवळी देवी संस्थानचे व्यवस्थापक सुर्दशन दहातोडे, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे आदिसह ग्रामस्थ उपस्थितीत होते. 

वाचा : मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लबवर दोन वर्षाची बंदी

यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे याच्या हातून महाराष्ट्रातील जनतेचे कामे होऊ दे. माझ्याकडून जनतेचे कामे घडु दे. सर्वांना सुख शाती लाभो. पाच वर्षे जनतेची सेवा करण्याची शक्ती मुख्यमंत्री यांना देवी देवो, असे साकडे आई भगवतीकडे  घातले.

- महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब 

 "