Sun, Sep 20, 2020 03:27होमपेज › Nashik › पशुधनास घातक लम्पी आजार जिल्ह्याच्या सीमेवर

पशुधनास घातक लम्पी आजार जिल्ह्याच्या सीमेवर

Last Updated: Sep 16 2020 10:53PM
नाशिक : नितीन रणशूर

कोरोनामुळे मानवी प्राणहानी वाढत असताना आता पशुधनही अचानक उद्भवलेल्या नव्या संसर्गजन्य रोगाच्या विळख्यात सापडते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.  लम्पी स्किन डिसीज अर्थात एलएसडी या संसर्गजन्य रोगाने राज्यात  हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. या रोगात मृत्यूदर 3 ते 5 टक्क्यांपर्यंत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

मराठवाडा-विदर्भापाठोपाठ एलएसडी उत्तर महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात एलएसडीचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात या रोगाचा धोका वाढला आहेे. हा विषाणूजन्य रोग असून, कॅप्रीपॉक्स या विषाणूपासून उदभवतो. गायी व म्हशींमध्ये प्रामुख्याने हा रोग आढळून येतो. विशेषत: गायीमध्ये या रोगाचे प्रमाण जास्त आहे. मात्र, शेळ्या-मेंढ्यांना या रोगाची लागण होत नाही. त्यातल्या त्यात थेट जनावरांपासून माणसांना ‘लम्पी’ होत नसल्याची बाब दिलासादायक आहे. सर्वप्रथम ओरिसात तर राज्यात गडचिरोलीमध्ये लम्पीबाधित जनावरे आढळून आली होती. राज्यावर ‘लम्पी’चे संकट घोंगावू लागले आहे. 

‘लम्पी’ रोगाची लक्षणे

    प्रथम जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते.
    जनावरांना मध्यम व तीव्र स्वरूपाचा ताप येतो.
    त्वचेवर हळूहळू 10-15 मि.मी. व्यासाच्या गाठी येतात.
    लसिका ग्रंथींना सूज येते. 
    तोंड, नाक, कान आदी ठिकाणी व्रण निर्माण होतात. 

 "