होमपेज › Nashik › जळगाव मतदारसंघात १४,रावेरमध्ये १२ उमेदवार रिंगणात

जळगाव मतदारसंघात १४,रावेरमध्ये १२ उमेदवार रिंगणात

Published On: Apr 08 2019 5:22PM | Last Updated: Apr 08 2019 5:24PM




जळगाव : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी  नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीत जळगाव लोकसभा मतदारसंघातून पाच उमेदवारांनी, तर रावेर मतदारसंघातून चार उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता जळगावमध्ये 14, तर रावेर मतदारसंघात 12 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

जळगाव मतदारसंघात भाजपाचे उन्मेश पाटील, बसपाचे राहुल बनसोडे,  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गुलाबराव देवकर, राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे मोहन बिर्‍हाडे, हिंदुस्थान निर्माण दलचे श्री बाबा महाहंसजी महाराज, बहुजन मुक्‍ती पार्टीचे ईश्‍वर मोरे, वंचित बहुजन आघाडीच्या अंजली बाविस्कर, राष्ट्रीय जनशक्‍ती पार्टीचे शरद भामरे यांच्यासह अपक्ष रिंगणात आहेत. तर सतीश पाटील, गनीशाह इस्हाक शाह, प्रदीप मोतीराया, वंदना प्रभाकर पाटील, रऊफ युसूफ शेख यांनी अर्ज मागे घेतले आहेत.

रावेर मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील, भाजपाच्या रक्षा खडसे, बहुजन समाज पार्टीचे योगेंद्र कोलते, आंबेडकराइट पार्टी ऑफ इंडियाचे अडकमोल रमेश, राष्ट्रीय आम जनसेवा पार्टीचे अजित तडवी, वंचित बहुजन आघाडीचे नितीन कांडेलकर, हिंदुस्थान जनता पार्टीचे मधुकर पाटील आदींसह अपक्ष रिंगणात आहेत. तर या मतदारसंघातून रवींद्र पवार, सुनील पाटील, सुनील जोशी, इम्रान रऊफ खान यांनी अर्ज मागे घेतले आहेत.

जळगाव लोकसभा मतदार संघासाठी निवडणूकीच्या रिंगणातील उमेदवार 

उन्मेश भैय्यासाहेब पाटील -  भारतीय जनता पार्टी

राहुल नारायण बनसोडे - बहुजन समाज पार्टी

गुलाबराव बाबुराव देवकर - राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी

मोहन शंकर बिऱ्हाडे - राष्ट्रीय समाजवादी पक्ष (सेक्युलर)  

संत श्री बाबा महाहंसजी महाराज पाटील - हिंदुस्थान निर्माण दल

 ईश्वर दयाराम मोरे - बहुजन मुक्ती पार्टी

श्रीमती. अंजली रत्नाकर बाविस्कर - वंचित बहुजन आघाडी

शरद गोरख भामरे (सुतार) - राष्ट्रीय जनशक्ती पार्टी (सेक्युलर), 

अपक्ष उमेदवार 

सुभाष शिवलाल खैरनार, संचेती रुपेश पारसमल, अनंत प्रभाकर महाजन, ओंकार चेनसिंग जाधव, मुकेश राजेश कुरील, ललीत गौरीशंकर शर्मा 

 

रावेर लोकसभा मतदार संघासाठी निवडणूकीच्या रिंगणातील उमेदवार 

डॉ. उल्हास वासुदेव पाटील - इंडियन नॅशनल कॉग्रेस, 

 रक्षा निखिल खडसे - भारतीय जनता पार्टी,

योगेंद्र विठ्ठल कोलते - बहुजन समाज पार्टी, 

अडकमोल रोहीदास रमेश - आंबेडकराईट पाटी ऑफ इंडिया,

अजित नामदार तडवी - राष्ट्रीय आम जनसेवा पार्टी, 

नितीन प्रल्हाद कांडेलकर - वंचित बहुजन आघाडी, 

मधुकर सोपान पाटील - हिंदूस्थान जनता पार्टी, 

रोशन आरा सादीक अली - इंडियन युनियन मुस्लिम लीग,  

अपक्ष उमेदवार 

गौरव दामोदर सुरवाडे, तंवर विजय जगन, नजमीन शेख रमजान, डी. डी. वाणी (फोटोग्राफर), हे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहे.