Tue, Nov 12, 2019 22:35
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › नाशिकः हिंदू धर्मियांनी लिंगायत धर्माला पाठिंबा द्यावा

नाशिकः हिंदूनी लिंगायत धर्माला पाठिंबा द्यावा

Published On: Apr 29 2018 2:48PM | Last Updated: Apr 29 2018 2:49PMनाशिक रोडः वार्ताहर 

देशातील विविध धर्मांनी आम्हांला स्वतंत्र लिंगायत धर्म म्हणून मान्यता देण्यासाठी पाठिंबा दर्शविला असून हिंदु धर्माने देखील आम्हाला पाठिंबा देऊन स्वतंत्र लिंगायत धर्माला मान्यता द्यावी, अशी मागणी लिंगायत समाजाने नाशिक येथे काढलेल्या महामोर्चात केली.

लिंगायत संघर्ष समितीतर्फे आज (रविवारी दि. २९) नाशिकरोड येथील पासपोर्ट कार्यालय ते विभागीय महसूल आयुक्त कार्यालय या मार्गावर लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्यावी, यामागणीकरिता महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नाशिकसह अहमदनगर, जळगांव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील लिंगायत समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

नाशिकरोड येथील पासपोर्ट कार्यालयाजवळ सकाळी अकरा वाजेपासून लिंगायत समाज बांधव जमा होण्यास सुरुवात झाली. येथे लिंगायत संघर्ष  समाज समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उपस्थित समाज बांधवाना मार्गदर्शन केले. दुपारी दीड वाजेच्या सुमाराला मोर्चाला सुरुवात झाली. विभागीय सहायक आयुक्त संदीप माळोदे यांना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने महामोर्चाची सांगता झाली.
 

Tags : Lingayat religion, Hinduism, support, independence religion, nashik news