Thu, Jan 28, 2021 08:50होमपेज › Nashik › नाईक शिक्षण संस्थेत सत्ताधार्‍यांना धक्का

नाईक शिक्षण संस्थेत सत्ताधार्‍यांना धक्का

Published On: Jul 22 2019 2:03AM | Last Updated: Jul 21 2019 11:51PM
नाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यात मविप्र संस्थेनंतर अग्रगण्य असलेल्या क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विरोधी गटाच्या क्रांतिवीर पॅनलने जोरदार मुसंडी मारत सत्ताधारी प्रगती पॅनलला धक्का  दिला आहे. रात्री उशिरा हाती आलेल्या निकालानुसार तालुका संचालकपदांच्या 15 पैकी 14 जागा क्रांतिवीरने तर अवघ्या एका जागेवर सत्ताधारी प्रगती पॅनलला विजय मिळविता आला. एकूण जागा 29 पैकी 15 जागांचे निकाल जाहीर झाले असून, उर्वरित पदांसाठी रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती.   

दरम्यान, हाती आलेल्या वृत्तानुसार प्रगती पॅनलचे सहचिटणीसपदाचे उमेदवार अ‍ॅड. तानाजी जायभावे 252 मतांनी विजयी झाले, तर सरचिटणीसपदाचे उमेदवार हेमंत धात्रक हे क्रांतिवीर पॅनलचे अभिजित दिघोळे यांच्यापेक्षा 20 मतांनी आघाडीवर होते. अभिजित हे माजीमंत्री तुकाराम दिघोळे यांचे पुत्र आहेत. उपाध्यक्षपदाचे ‘क्रांतिवीर’चे उमेदवार अ‍ॅड. पी. आर. गिते एक हजाराहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत.

रविवारी (दि.21) सकाळी 8 वाजेदरम्यान गंगापूर रोडवरील चोपडा लॉन्स येथे मतमोजणीस सुरूवात झाली. सुरूवातीला मतपेट्यांमधील मतपत्रिकांचे वर्गीकरण करण्यात येऊन गठ्ठे तयार करण्यात आले.  शनिवारी 79 टक्के मतदान झाले होते. मतदानास सभासदांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता ही निवडणूक सत्ताधार्‍यांना धक्का देणारी वा चुरशीची ठरेल, असा कयास बांधला जात होता. रविवारी झालेल्या मतमोजणीमुळे या अंदाजाला पुष्टी मिळाली.  मतदारांनी यंदा सत्ताधारी गटाला हुलकावणी देत जबर धक्का दिला आहे. 

दोन्हीही पॅनल्सच्या समर्थकांनी सकाळपासून लॉन्सबाहेर गर्दी केली होती. ही गर्दी सायंकाळी वाढतच गेली. दुपारी 12च्या दरम्यान प्रत्यक्ष मोजणीस सुरूवात झाल्यानंतर पहिल्या पाच जागांवरील कल हाती येताच लॉन्सबाहेरील समर्थकांची संख्या कमी-जास्त झाली. 

नाईक संस्थेत सत्ताधार्‍यांना धक्का

सायंकाळनंतर सुमारे 14 जागांवर क्रांतिवीर पॅनल आघाडीवर असल्याची वार्ता पसरताच या पॅनलच्या समर्थकांनी हळूहळू मतमोजणी केंद्राच्या परिसरात धाव घेतली. या मतमोजणीसाठी जिल्हाभरातून सभासद व दोन्ही पॅनल्सचे समर्थक शहरात तळ ठोकून होते. 

सिन्नर : 3 जागा : (पहिले तीन) विजयी 

1) अशोक नामदेव भाबड : (क्रांतीवीर) : 3058 
2) रामनाथ बबन बोडके : (क्रांतीवीर) : 3042 
3) उत्तम यशवंत बोडके : (क्रांतीवीर) : 2975 
4) परसराम पांडुरंग आव्हाड : प्रगती : 2640 
5) हेमंत नारायण नाईक : प्रगती : 2554 
6) शरदचंद्र नाना  घुले : प्रगती :  2381 
7) अमृतराव खंडेराव सांगळे : अपक्ष : 170 

महिला संचालिका : 2 जागा  

1) शोभा पांडुरंग बोडके : क्रांतिवीर 3574 (विजयी)
2) अंजनाबाई त्र्यंबक काकड : 3215
3)  अरुणा प्रवीण कराड : 3228 (आघाडीवर) 
4) आक्काबाई पांडुरंग सोनवणे : 2718 
5) चंद्रकला बबन साबळे : 150

 नांदगाव-बागलाण-कळवण : 2 जागा : विजयी 

1) जयंत शिवाजी सानप (क्रांतिवीर) : 3642 
2) विजय पंडित बुरकुल : (क्रांतिवीर) 3486
3) विजय शंकर इप्पर : प्रगती : 2860
4) रमेश गोविंदा बोडके : 2839

येवला-मालेगांव : 2 जागा : 

1) तुळशीराम अंबादास विंचू : (क्रांतिवीर) : 3339 
2) विजय दत्तू सानप : (क्रांतिवीर) : 3324    
3) दिनेश विठ्ठल आव्हाड : प्रगती : 2910 
4) संपत लक्ष्मण वाघ : प्रगती : 2797 
5) सोपान फकीरा वाघ : अपक्ष : 51    

दिंडोरी-पेठ-सुरगाणा : 3 जागा : 

1) दौलत धोंडीराम बोडके : (क्रांतिवीर) : 3183 
2) श्याम गणपत बोडके : (क्रांतिवीर) 3119 
3) भगवंत चकोर : (क्रांतिवीर) : 2882
4) शरद लक्ष्मण बोडके : प्रगती : 2538
5) भालचंद्र रामदास दरगोडे : प्रगती : 2474
6) कचरू काशीनाथ आव्हाड : प्रगती : 2429 
7) गोपीनाथ किसन बोडके : 96 : अपक्ष