Tue, May 26, 2020 13:17होमपेज › Nashik › अॅट्रॉसिटीचा अर्ज फेटाळल्याने कोतवालाचा आत्मदहनाचा प्रयत्न 

अॅट्रॉसिटीचा अर्ज फेटाळल्याने कोतवालाचा आत्मदहनाचा प्रयत्न 

Published On: May 24 2018 8:16AM | Last Updated: May 24 2018 12:01PMजळगाव(जि. नाशिक) : प्रतिनिधी

प्रांत अधिकाऱ्यांनी अॅट्रॉसिटीचा अर्ज फेटाळल्याने कोतवालाने अंगावर रॉकेल ओतून घेत प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. प्रविण दगडू गांगुर्डे असे आत्‍मदहनाचा प्रयत्‍न करणाऱ्या कोतवालाचे नाव आहे. पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथिल तलाठ्याने जातीवाचक शिवीगाळ केल्याची खोटी तक्रार पिंपळगाव हरे पोलिस ठाण्यात दाखल करण्यासाठी प्रांत अधिकाऱ्यांची परवानगी घेण्यासाठी गेल्‍यानंतर कोतवालाने हे कृत्‍यू केले. 

याबाबत अधिक माहिती अशी, गांगुर्डे याने कळमसरा गावतील तलाठ्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्‍याचा आरोप करून पिंपळगाव येथील पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटी अंतर्गत तक्रार दाखल करण्यासाठी गेला होता. मात्र, कोतवाल शासकीय कर्मचारी असल्याने अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल करण्यासाठी वरिष्‍ठ अधिकाऱ्याची परवानगी लागते. ही परवानगी घेण्यासाठी त्‍याने प्रांत अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. प्रांत अधिकाऱ्याने त्‍याला हा अर्ज फेटाळून लावला. त्‍यामुळे त्‍यांने प्रांत अधकाऱ्यांना भेटण्यासाठी वेळ मागितली. यावेळी प्रांत अघिकारी मत्‍वाच्या कामात आहेत दहा मिनिटे थांबा असे तेथील कर्मचाऱ्याने सांगितले. याचा राग आल्‍याने गांगुर्डे याने त्‍याच ठिकाणी सोबत आणलेल्‍या बाटलीतील पेट्रोल अंगावर ओतून स्‍वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्‍न केला. मात्र, कोतवालाजवळ पेटवून घेण्यासाठी काडेपेटीच नव्हती. रॉकेल ओतल्‍याचे लक्षात येताच घटनास्‍थळी असलेल्‍या पोलिसांनी त्‍याला ताब्‍यात घेतले. 

दरम्‍यान, गांगुर्डे या कोतवालाने यापूर्वी २००९ मध्येही प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. कोतवालाने केलेल्‍या या प्रकारामुळे तत्‍कालीन तलाठ्याने नोकरी सोडून दिली होती. तर, त्याच्या खोट्या तक्रारींमुळे आतापर्यंत दोन तलाठ्यांचे निलंबनही करण्यात आले आहे. तसेच त्‍याने माजी पोलिस पाटलांवर अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल केल्याने भितीपोटी हृदयविकाराच झटका आल्‍याने पोलिस पाटलांचे निधन झाले होते. कोतवालाच्या या हरकतींमुळे गावकऱ्यांनी ग्राम सभेत ठराव करून ६ महिन्यासाठी त्‍याचे निलंबन केले होते, अशी माहिती गावकऱ्यांनी सांगीतली.

मी कोतवाल गांगुर्डे यास कोणत्‍याही प्रकाची जाती वाचक शिवीगाळ केली नाही. त्याने माझ्यासह अनेकांवर खोटे गुन्हे दाखल केले असून, गावकऱ्यांनी ग्रामसभेत ठराव करून त्याचे सहा महिने निलंबन केले होते. अशी माहिती तलाठी भरत परदेशी  यांनी पुढारी ऑनलाईनशी बोलतना दिली. 

Tags : nashik jalgaon, Kotwal, suicide, Atrocity