Thu, Jul 09, 2020 22:37होमपेज › Nashik › 'पक्षाशी प्रामाणिक राहिलो हा गुन्हा मी केला'

'पक्षाशी प्रामाणिक राहिलो हा गुन्हा मी केला'

Published On: Oct 01 2019 4:07PM | Last Updated: Oct 01 2019 4:27PM

माजी महसुलमंत्री एकनाथ खडसेजळगाव : प्रतिनिधी

भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. पहिल्या यादीमध्ये भाजपाचे ज्‍येष्ठ नेते व माजी महसुलमंत्री एकनाथ खडसे यांचे नाव वगळण्‍यात आले आहे. मात्र उन्मेष पाटील यांच्या चाळीसगाव मतदार संघातील नवख्या व पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार्‍या मंगेश चव्हाण यांचे नाव जाहीर झाले आहे. तर, अपक्ष उमेदवार यांनाही भाजपाने उमेदवारी दिली आहे. मात्र, सहावेळा भाजपाच्या तिकीटावर जिंकलेले एकनाथ खडसे यांचे नाव नसले तरी त्यांनी आज आपले नामनिर्देशन पत्र भरले आहे. नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर पत्रकारांना एकनाथ खडसे म्हणाले की, पक्षाशी प्रामाणिक राहणे हा गुन्हा आहे, तर हा गुन्हा मी केला आहे. आज या प्रक्रियेत नसलो तरी कालाय तस्मे: नम: असे म्हणून ते मेळाव्याला निघून गेले.

भाजपाच्या पहिल्या यादीत माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचे नाव नाही.  मात्र, जिल्ह्यातील 7 पैकी 6 ठिकाणचे उमेदवार भाजपाने जाहिर केले आहेत. यात जामनेर - गिरिश महाजन, रावेर - हरिभाऊ जावळे, भुसावळ- संजय सावकारे, जळगाव शहर- सुरेश भोळे (राजुमामा भोळे), अमळनेर- शिरिष चौधरी अपक्ष उमेदवार म्हणून निवडूण आले होते. त्‍यांना यावेळेस भाजपाने तिकीट दिले आहे. तर चाळीसगाव मतदार संघातील उन्मेष पाटील यांच्या जागी त्यांचे मित्र मंगेश चव्हाण यांना पक्षाने तिकीट दिले आहे. 

मात्र, खडसे यांना पहिल्या यादीत स्थान दिलेले नाही. यावरून अनेक तर्कवितर्क मतदारसंघात लावण्यात येत आहे. ज्याप्रमाणे गेल्यावेळेस भाजपाची सरकार तयार होतांना पहिल्या मंत्र्याच्या यादीत खडसे होते व गिरिष महाजन हे दुसर्‍या यादीत होते. यावेळेस तिकीटासाठी त्यांचे नाव दुसर्‍या यादीत जाहीर होणार आहे, अशी अटकळे लावली जात आहे. 

आज मुहूर्त असल्यामुळे मी माझा अर्ज दाखल केला आहे. त्यासाठी आज यादीमध्ये नाव आहे की, नाही मला कल्पना नाही. परंतु, अजून यादी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी यापुढे आपला अर्ज भरलेला आहे. यादीची वाट पाहतो आहे. वरिष्ठांशी बोलणार असल्‍याचे एकनाथ खडसे यावेळी म्‍हणाले. 

ही जागा सेनेला जात आहे असे विचारले असता, एकनाथ खडसे म्हणाले की, जाते की नाही ते मला माहिती नाही. परंतु मी गेले 42 वर्षे या मतदारासंघात व महाराष्ट्रात भाजपाचे काम प्रामाणिक पणे करतो आहे. मी अत्यंत प्रामाणिकपणे काम केले मला अनेक प्रलोभणे आली. तसेच पक्ष सोडावा असा दबाव आला. परंतु मी भाजपापासून दूर गेलो नाही. शेवटी पक्षाची प्रमाणिक राहणे हा गुन्हा असेल तर मी केला आहे गुन्‍हा, असे देखील एकनाथ खडसे म्‍हणाले.

पूर्वी आपण उमेदवारी यादी जाहीर करायचा.  मात्र, आज पहिल्या यादीत आपले नाव नाही असे विचारले असता खडसे म्हणाले,  आतापर्यंत जवळपास 25 वर्षे झाली गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन व मी स्वत: या प्रक्रियेत राहायचो आणि नेते ही राहायचे. आम्ही सामुहिक निर्णय त्यात घ्यायचो. तिकीट वाटपामध्ये मी होतो.त्याठिकाणी राज्यभरात युती तोडण्याची घोषणा असो की यासंदर्भात भाजपाने ज्याकाही जबाबदार्‍या दिल्या आहेत त्या मी पार पाडत आलो आहे.  आता कालाय तस्मेय नम: असे म्हणून खडसे मेळावासाठी गेले.