नंदुरबार : घरकुलाचा हप्ता वर्ग करण्यासाठी लाच मागणारा लिपिक अटकेत

Last Updated: Dec 09 2019 6:42PM
Responsive image


नंदुरबार : प्रतिनिधी 

तळोदा येथील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कनिष्ठ लिपिक अंकुश फकिरा चित्ते, यांनी घरकुलचे पहिला हप्ता बँक खात्यात टाकून देतो, असे सांगून लाभार्थ्यांकडून ५०० रुपयांची मागणी करीत लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. 

याबाबत अधिक माहिती अशी की, घरकुलाच्या पहिला हप्त्यातील रक्कम बँकेच्या खात्यावर जमा करण्यासाठी लिपिक अंकुश चित्ते यांनी लाभार्थी दता ठाकरे यांच्या घरकुलाचा पहिला हफ्ता १५ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात टाकण्यासाठी त्यांच्याकडून ५०० रुपये मागणी केली होती. वेळोवेळी विनवण्या करूनही पैसे दिल्याशिवाय काम होणार नसल्याचे सांगितल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. 

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी शिरीष जाधव पोलीस निरीक्षक प्रकाश आहिरे, पोलीस निरीक्षक जयपाल अहिरराव, कॉन्स्टेबल  उत्तम महाजन, पो. ना. दीपक चित्ते, हेडकॉन्स्टेबल संजय घुमाने, ज्योती पाटील संदीप नावडीकर, मनोहर बोरसे यांनी सापळा रचून आज दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास कार्यालयाच्या बाहेर सार्वजनिक ठिकाणी ५०० रुपयांची लाच घेताना अंकुश चित्ते यास रंगेहाथ पकडले. यावरून पोलीस ठाण्यात उशिरा पावेतो गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरू होती.
 

अजित पवारांनी 'ते' ट्विट तासाभरातचं केलं डिलीट!


सांगलीत मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन


कृषी विधेयक रद्द करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सांगलीत निदर्शने


सलमानचा आवाज एस. पी. बालसुब्रमण्यम


बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, कोरोना रुग्णांनाही करता येणार मतदान


मुंबई : मराठा आरक्षणासाठी पनवेलमध्ये ठिय्या आंदोलनाला सुरूवात


प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन


कामगार कायद्यातील दुरुस्तीचा पहिला फटका; नाशिकमध्ये २० कामगारांना नोकरीवरुन काढलं!


औरंगाबाद : आयशर टेम्पोमधून चोरट्यांनी केली दीड लाखांची चोरी, राष्ट्रीय महामार्गावरील घटना  


सोने खरेदीची सुवर्ण संधी; दरात मोठी घसरण