Tue, Nov 19, 2019 03:30होमपेज › Nashik › जळगाव : मोबाईल शॉपीमधून दोन लाखांचे स्मार्टफोन्स लंपास

जळगाव : मोबाईल शॉपीमधून दोन लाखांचे स्मार्टफोन्स लंपास

Published On: Feb 12 2019 11:43AM | Last Updated: Feb 12 2019 11:36AM
जळगाव : प्रतिनिधी   

जिल्हा पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी ऑल वॉश आऊट अभियान राबवले. आता या अभियानाला चोरांनी आव्हान देत डल्ला मार सुरू केले आहे. शहरातल्या गोलाणी मार्केटमधील मोबाईल शॉपीमध्ये चोरट्यांनी डल्ला मारून सुमारे दोन लाख रूपयांचे स्मार्टफोन लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

पोलिसांनी ऑल आऊट अभियान राबवून 335 गुन्हेगार पकडले, या अभियानाला दोन दिवस होत नाही तोच चोरांनी गोलाणीत मोठा डल्ला मारून त्यांच्या वॉश आऊट अभियानाला आव्हान दिल्याचे दिसत आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील गोलाणी मार्केटमध्ये मोबाईल शॉपी मोठ्या प्रमाणात आहेत. यातील एका शॉपीमध्ये चोरट्यानी चोरी केल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले. यामध्ये माऊली मोबाईल अँड ॲक्सेसरीजमधील १७ स्मार्टफोन चोरी करण्यात आले असून याचे मूल्य सुमारे दोन लाख रूपये आहे. 

याशिवाय ‘एक ओंकार’ ही मोबाईल शॉपी लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच सुरेश प्रोव्हीजनमध्येही चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशीस प्रारंभ केला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत गुन्हा नोंदणीचे काम सुरू होते.