Fri, Sep 18, 2020 13:02होमपेज › Nashik › जळगाव जिल्ह्याने दुसऱ्या दिवशीही केला ५०० रुग्णांचा आकडा पार

जळगाव जिल्ह्याने दुसऱ्या दिवशीही केला ५०० रुग्णांचा आकडा पार

Last Updated: Aug 11 2020 8:17PM

संग्रहीत छायाचित्रजळगाव : पुढारी वृत्तसेवा

जळगाव जिल्ह्याने आज पुन्हा ५०० चा आकडा पार केला आहे.  जिल्ह्यात ५२८ बाधित आढळले आहेत.  तर ६ जणांचा मृत्यू झाला आहे. आज पाच तालुक्यांनी अर्ध शतक केली आहेत. असे तरी जिल्ह्याने १५ हजारांचा आकडा पार केला आहे. 

वाचा : भारत बायोटेकच्या कोरोना लसीच्या दुसर्‍या टप्प्यातील चाचणीला नागपुरात सुरूवात

त्यामुळे शासनाच्या चिंता वाढविल्या असल्या तरी शासनास मृत्यू दर कमी करण्यात यश आले आहे. आज जिल्ह्यात ६ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. तरी सर्वाधिक रुग्ण हे जळगाव शहरात तर अमळनेर, एरंडोल, धरणगाव, जामनेर यांनी अर्ध शतक केली आहेत. 

आज जिल्ह्यात कोरोनाच्या विळख्यातून ३७५ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात एकूण १०६८० रुग्ण आजपर्यंत बरे झाले आहेत.  

जळगाव शहर ९४ ( ३७९१ ), जळगाव ग्रामीण १९ (७६४ ), भुसावळ ८ ( १०५७ ), अमळनेर ५० (११३९ ), चोपडा ३० (१११० ), पाचोरा १७  (६१६)  भडगाव ४८ (६९०), धरणगाव ६३ (७२७ ), यावल ८ (५४८), एरंडोल ५१ (८३९), जामनेर ५०(११३६), रावेर १६ (८०१), पारोळा १० (६११),  चाळीसगाव ४५ (७५०) , मुक्ताईनगर १३ (४७७) बोदवड ३(२६९),  दुसऱ्या जिल्ह्यातील २ ( ६६ ) असे एकूण कोरोना बाधित ५२८ ( १५३९१ ) आहे.

वाचा : 132 खासगी रुग्णालयांतील बिले मनपा तपासणार

 "