Mon, Aug 10, 2020 04:57होमपेज › Nashik › जळगावने ओलांडला चार हजाराचा आकडा

जळगावने ओलांडला चार हजाराचा आकडा

Last Updated: Jul 05 2020 9:10PM

प्रातिनिधीक फोटोजळगाव : पुढारी वृत्तसेवा 

जिल्हा गेल्या आठवड्यापासून कोरोनाग्रस्तांचा शंभराचा आकडा पार करत होता. त्यात आता नव्या आलेखाची भर पडली असून जळगावने कोरोनाबाधितांचा द्विशतकांचा आकडाही पार केला आहे. आज रविवारी (दि.५) पुन्हा जिल्ह्याने द्विशतकीय आकडा पार केला असून २५४ रूग्ण सापडले. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ४ हजार ४३० गाठला असून यात जळगाव शहरात ९५८, भुसावळ ४७० कोरोनाबाधित आहेत. तर तीन तालुक्यांनी ३०० चा आकडा पार केला आहे.   

जळगावमध्ये पुन्हा लॉकडाऊन

आज आलेल्या अहवालावरून जिल्ह्यात नवे २५४ कोरोनाचे रूग्ण सापडले असून ८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यात जळगाव शहर ३, जळगाव ग्रामीण २, एरंडोल १, जामनेर १, पारोळा १ असे रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाने २७१ जणांचा बळी गेला आहे. 

आज सापडलेले कोरोनाबाधित हे जळगाव शहर, अमळनेर, चोपडा,  यावल, एरंडोल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड या तालुक्यात सर्वाधिक आहेत. जो नियमित स्पॉट आहे तेथेही रूग्ण सापडले आहेत. यात २०७ रूग्ण हे चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.   

जिल्ह्यात सर्वोच्च 323 रुग्ण

आज सापडलेले रूग्ण

जळगाव शहर ६४, जळगाव ग्रामीण ३, भुसावळ ८, अमळनेर १५, चोपडा २३, पाचोरा ४, भडगाव ०, धरणगाव ६, यावल २५, एरंडोल १३, जामनेर २, रावेर २२, पारोळा ३, चाळीसगाव १९, मुक्ताईनगर २१, बोदवड २४, दुसऱ्या जिल्ह्यातील २ असे २५४ रूग्ण सापडले आहे 

तर जळगाव शहराने ९५८, जळगाव ग्रामीण १६९, भुसावळ ४७०, अमळनेर ३८३, चोपडा ३०२, पाचोरा १०३, भडगाव २५०, धरणगाव १९२, यावल २७२, एरंडोल २३४, जामनेर २२९,  रावेर ३२३, पारोळा २५७, चाळीसगाव ७५, मुक्ताईनगर ७१, बोदवड १२९,  दुसऱ्या जिल्ह्यातील १३ रूग्ण सापडले आहे