Thu, Nov 14, 2019 17:55होमपेज › Nashik › जळगाव : रावेर मतमोजणीची तयारी पूर्ण

जळगाव : रावेर मतमोजणीची तयारी पूर्ण

Published On: May 23 2019 8:24AM | Last Updated: May 23 2019 8:24AM
जळगाव : प्रतिनिधी

जळगावमधील रावेर लोकसभा मतदार संघाची मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून अधिकारी व कर्मचारी मतमोजणी कक्षात पोहचले आहेत. तर सर्वप्रथम टपाल मतांची मोजणीला सुरवात होणार आहे. मात्र पोलिसांनी नेहमी प्रमाणे पत्रकाराची अडवणूक केली आहे. 

 प्रथम मतदार केंद्रात मोबाईल नेण्यास परवानगी देण्यात आली नाही.  जिल्हाधिकारी पत्रकाराचा फोन घेत नव्हते. तर जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी गेटवरील अधिकारी यांच्याशी चर्चा करून पहिल्या गेटवरून आत पत्रकार सोडण्यात आले. 

तर जळगाव लोकसभा मतदार संघासाठी जिल्हाधिकारी डॉ अविनाश आठाव तर रावेर लोकसभा मतदार संघासाठी गोरक्षनाथ गाडीलकर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. यामध्ये जळगाव लोकसभेसाठी २४ फेऱ्या तर रावेर मतदार संघासाठी २३ फेऱ्या होणार आहेत.