Tue, May 26, 2020 12:11होमपेज › Nashik › जळगाव : तीन विविध दुर्घटनांमध्ये तिघांचा मृत्यू

जळगाव : तीन विविध दुर्घटनांमध्ये तिघांचा मृत्यू

Published On: Feb 04 2019 5:06PM | Last Updated: Feb 04 2019 5:06PM
जळगाव : प्रतिनिधी 

जळगावमधील पाचोरा तालुक्यात तीन विविध दुर्घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. सोमवारी (दि.४) रोजी विविध ठिकाणी हे अपघात झाले. महजी भिल (४०), समाधान एकनाथ पाटील (३५) आणि सुनील गिरधर पाटील (४९) अशी तिघा मृतांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील महजी येथील पांडुरंग भिल (वय ४०) यांनी (दि.3)  च्या मध्यरात्री आपल्या राहत्या घरात कोणीच नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा असा परिवार आहे. 

या तालुक्यातील कुरगी येथील समाधान एकनाथ पाटील (वय ३५) हे शनिवारपासून घरातून बेपत्ता होते. त्यांची चप्पल आणि मोबाईल (दि. 3) रोजी भैरवनाथ मंदिर येथे सापडले होते. त्यांचा मृतदेह सोमवारी सकाळी ८ वाजता बहुळा नदीवर पूल बांधण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्यात आढळून आला आहे. 

तालुक्यातील शिंदाड येथील सुनील गिरधर पाटील (वय ४९) यांनी सोमवारी आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. 

हे तिन्ही मृतदेह पाचोरा येथील ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले आहेत. वरील तिन्ही गुन्हे पिंपळगाव हरेश्वर आणि पाचोरा पोलिसांत नोंद करण्यात आले आहेत.