Wed, Sep 23, 2020 03:16होमपेज › Nashik › जळगाव : चौथ्या दिवशीही दोनशेच्यावर कोरोना रुग्ण

जळगाव : चौथ्या दिवशीही दोनशेच्यावर कोरोना रुग्ण

Last Updated: Jul 15 2020 7:37AM

संग्रहित छायाचित्रजळगाव : पुढारी ऑनलाईन

जळगाव जिल्ह्यात आज (ता.१५) चौथ्या  दिवशीही कोरोना रुग्णसंख्येने  दोनशेचा आकडा पार  केला. जिल्ह्यातील  सर्वांधिक रुग्णांचा आकडा हा जळगाव शहरात निघाला आहे. शहरात ९४  तर एकूण रुग्णसंख्या १५७० एवढी आहे. दरम्यान, स्थानिक प्रशासनाकडून लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले होते. लॉकडाऊन काळातही जिल्ह्यात दररोज २०० च्या वर रुग्णांत वाढ होत आहे. 

अधिक वाचा :  नाशिक : जिल्हा बँक ६०० कोटींचे पीककर्ज वाटप करणार

जिल्ह्यात काल कोरोना बाधितांमध्ये २२५ ने वाढ झाली. तर एकूण आकडा ६३९३ वर गेला आहे. १८४ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहे. जळगाव शहर ३, जळगाव ग्रामीण २,  चोपडा १, यावल १, चाळीसगाव १, एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे तर जिल्ह्यात ३४३  जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

 "