Tue, Nov 19, 2019 15:13होमपेज › Nashik › जळगाव : मनसे विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

मनसे विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

Published On: Aug 23 2019 12:32PM | Last Updated: Aug 23 2019 12:32PM

मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकार्‍यांना आज सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.जळगाव : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्‍यात निषेध करण्याचा इशारा देणार्‍या मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकार्‍यांना आज सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे यांनी कालच एका निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशारा दिला होता. सूडाच्या भावनेतून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीने केलेली चौकशी, माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना झालेली अटक, जळगावातील समांतर रस्त्यांचा चिघळललेला प्रश्‍न आणि हुडकोच्या कर्ज फेडीतील जाचक अटींच्या पार्श्‍वभूमीवर हा निषेध करण्यात येणार असल्याचे विनोद शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते.

दरम्यान, आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल होण्याआधीच मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, उपाध्यक्ष चेतन पाटील, शहर अध्यक्ष योगेश पाटील, उपशहर अध्यक्ष  पंकज पाटील, शहर सचिव बबलू कदम, विश्वनाथ ठाकूर यांना पोलिसांनी मुबई ऍक्ट 68,69 प्रमाणे ताब्यात घेण्यात आले आहे.