Fri, Jun 05, 2020 14:14होमपेज › Nashik › जळगाव केटामाइन साठा ; सात जण दोषी

जळगाव केटामाइन साठा ; सात जण दोषी

Published On: Apr 18 2019 2:08AM | Last Updated: Apr 18 2019 12:25AM
जळगाव : प्रतिनिधी

जळगाव येथील उमाळा शिवारात आणि औद्योगिक वसाहतीतील रुखमा इंडस्ट्रिज येथे छापा टाकून डीआरआय पथकाने 1,175 किलो केटामाइन जप्त केले होते. या प्रकरणी 12 जणांवर न्यायालयात खटला सुरू होता. बुधवारी न्यायालयाने सात जणांना दोषी ठरविले असून, पाच जणांना दोषमुक्‍त केले आहे.

अमली पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या केटामाइनचा सुमारे 1.2 टनचा साठा केंद्रीय महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) जळगावात डिसेंबर 2013 मध्ये जळगावमधील उमाळा शिवारात आणि औद्योगिक वसाहतीतील रुखमा इंडस्ट्रिज येथे पकडला होता. या प्रकरणी 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपी अरुणकुमार तिवारी (37, विक्रोळी, मुंबई), गैरप्रसाद पाल (51, विक्रोळी, मुंबई), निद्यानंद तेवर (27, धारावी, मुंबई), कांतीलाल सोनवणे (29, जळगाव), जी श्रीनिवास (47, पवई, मुंबई), विकास बोरी (43), खेमा झोपे (42, ठाणे), विलास चिचोले (63, जळगाव), नितीन चिचोले (51, जळगाव), रजनीश ठाकूर (45, सिकंदराबाद), एस. एम. सलेंडकुमार (43, चेन्‍नई), विलास पुरी (40, नवी दिल्ली) यांचा समावेश आहे. यापैकी अरुणकुमार तिवारी, जी श्रीनिवास, खेमा झोपे, विकास बोरी, रजनीश ठाकूर,  एस. एम. सलेंडकुमार या सात जणांना न्यायालयाने दोषी ठरविले. तर पाच जणांना निर्दोष मुक्त केले. पाच वर्षांपासून या खटल्याचे कामकाज जळगाव न्यायालयात सुरू होते. जागतिक बाजारपेठेत त्याची किंमत 118 कोटी रुपये होती.