Mon, Jan 25, 2021 06:26होमपेज › Nashik › जळगाव : जिल्हा बँकेच्या शाखेत दरोड्याचा प्रयत्न

जळगाव : जिल्हा बँकेच्या शाखेत दरोड्याचा प्रयत्न

Published On: Jul 16 2019 12:32PM | Last Updated: Jul 16 2019 12:32PM
जळगाव : प्रतिनिधी 

चाळीसगाव येथील हिरापूर रोड वरील जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. काल, सोमवार (दि.१५) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. आज सकाळी ही घटना उघडकीस येताच शहरात एकच खळबळ उडाली.

चाळीसगाव शहरातील हिरापूर रोडवर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. या शाखेत काल, रात्रीच्या सुमारास अंदाजे आठ ते दहा दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. बँकेचे शटर तोडून बँकेतील २०० ते ३०० किलो वजनाची तिजोरी बँकेतून बाहेर ओढून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरोडेखोरांना ही तिजोरी फुटली नाही. यामुळे त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.

ही घटना आज, मंगळवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची माहिती सर्वत्र पसरताच नागरिकांनी बँक परिसरात एकच गर्दी केली होती. यानंतर पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी  बँके शाखेतील मँनेजरला संर्पक केला. यावेळी बँकेतुन कुठलीही रोख रक्कम गेली नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांनी अधिक तपास करीत आहेत.