जळगाव : प्रतिनिधी
हतनुर धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाण्यात वाढ होणार आहे. त्यामुळे हतनूर धरणाचे सर्व 41 दरवाजे उघडण्यात आले. धरणातून 2 लाख 14 हजार 109 क्युसेक्स वेगाने नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने तापी नदी काठावरील गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी नागरिकांनी पुर परिस्थितीमध्ये खबरदारी व दक्षता घेणेबाबत आवाहन केले. त्या अनुषंगाने तापी नदीच्या काठावरील व धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सर्व नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. विशेषतः रात्रीच्या वेळी नदी नाल्याच्या पाण्याची पातळी वाढण्याची दाट शक्यता आहे. नदी पात्रात पाणी असताना आत जाऊ नये. अफवांवर विश्वास ठेवू नका, पूर असताना नदी ओलांडू नये. पाणी उकळुन प्यावे, सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. मातीच्या घरांची विशेष काळजी घ्या, अन्न पाणी साठवून ठेवावे असे आवाहन केले आहे.