Mon, Jul 06, 2020 22:19होमपेज › Nashik › प्रसूतीदरम्‍यान बाळाचा मृत्‍यू, पत्‍नी गंभीर, पतीची रुग्‍णालयातच आत्महत्या

प्रसूतीदरम्‍यान बाळाचा मृत्‍यू, पत्‍नी गंभीर, पतीची रुग्‍णालयातच आत्महत्या

Published On: Dec 31 2018 5:12PM | Last Updated: Dec 31 2018 5:12PM
जळगाव : प्रतिनिधी

जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या पत्नीची स्थिती गंभीर व जन्माआधीच मुलाचा मृत्यू झाल्याने आता जगून काय उपयोग आहे. या विवंचनेत देवला बारका बारेला (वय २६, रा. रामजीपाडा, उनपदेव ता.चोपडा) यांनी जिल्हा रुग्णालयात परिसरातीलच वृक्षाला स्वतःकडील रुमालाने गळफास घेतला. सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे.

चोपडा तालुक्यातील रामजीपाडा येथे देवलाची पत्नी उबर्‍याबाई,  मुलगा सोनगीश, मुलगी शारदाबाई, राहबाबाई यांच्यासह आई, वडिलांसह वास्तव्यास आहे. दुसर्‍याच्या शेतात काम करुन उदरनिर्वाह करणारे हे कुटुंब. प्रसूतीदरम्यान बाळाचा मृत्‍यू झाल्याने चोपडा येथील ग्रामीण रुग्णालयातून देवला यांची पत्नी उबर्‍याबाई हिला दोन दिवसांपूर्वीच जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. 

बाळाला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी शस्‍त्रक्रिया केली. शर्थीचे प्रयत्न करुनही बाळाचा मृत्यू झाला. यानंतर उबर्‍याबाई हिचा रक्तश्राव झाल्याने तिची प्रकृती गंभीर आहे,. तिला दररोज रक्त देण्यात येत आहे. तिच्याजवळ रुग्णालयता आई ढेमाबाई उनकार बारेला व पती देवला बारेला हे थांबले होते. 

रविवारी रात्री देवला जेवण करण्यासाठी उबर्‍याबाईकडे आले. याठिकाणी दोघांनी जेवण केले. यानंतर देवला सासू ढेमाबाई यांना सांगून झोपण्यासाठी प्रसूती कक्षातून जिल्हा रुग्णालय आवारात आला. त्यानंतर सकाळी त्याच्या आत्महत्येची बातमी मिळाल्याने ढेमाबाई यांनी सांगितले.

रुग्णालयातील इतर नातेवाईकांना वार्ड क्रमांक ९ च्या मागील बाजूस असलेल्या आवारात फिरत असताना वृक्षाला गळफास घेतलेला अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यांनी डॉक्टरांना कळविले. डॉक्टरांनी जिल्हापेठ पोलिसांना माहिती दिली. त्यावरुन पोलिस उपनिरिक्षक मनोज वाघमारे, करुणासागर जाधव, जितेंद्र सुरवाडे, भगवान महाजन, दिलीप पाटील, नंदकिशोर पाटील यांनी रुग्णालयातील कर्मचारी रामचंद्र पाटील यांच्यासह इतरांच्या मदतीने मृतदेह खाली उरविला. याबाबत जिल्हा पेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.