Tue, Jun 02, 2020 14:49होमपेज › Nashik › उन्मेष पाटील यांच्याबाबत अवमानकारक मजकूर; गुन्हा दाखल

उन्मेष पाटील यांच्याबाबत अवमानकारक मजकूर; गुन्हा दाखल

Published On: Apr 13 2019 1:46AM | Last Updated: Apr 12 2019 8:37PM
जळगाव : प्रतिनिधी 

महायुतीचे जळगाव लोकसभेचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांच्याबाबत सोशल मीडियात अवमानकारक मजकूर प्रसारित केल्या प्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव येथील पंजाब चव्हाण या व्यक्तीने आमदार उन्मेष पाटील यांच्याबाबत वैयक्तीक चारित्र्यहनन करणारा मजकूर काल मध्यरात्रीनंतर व्हाटसअ‍ॅप ग्रुपमध्ये प्रसारित केला होता. या अनुषंगाने येथील पोलिस स्थानकात भाजपचे शहराध्यक्ष व नगरसेवक घृष्णेश्‍वर रामकृष्ण पाटील यांनी फिर्याद दिली. यानुसार पंजाब चव्हाण (रा. गणेशपुर पिंप्री, ता. चाळीसगाव) याच्या विरूध्द माहिती तंत्रज्ञान कायदा २०००, कलम ६७ (अ) भादंवि ५०० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पीआय शिकारे हे करत आहेत. संशयितास ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

सध्या निवडणुकीच्या कालखंडात अनेक जण भावनेच्या भरात वाहून जात आपल्या मनातील खदखद सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करतांना आढळून येत आहेत. यामुळे निवडणुकीच्या कालखंडात संयम बाळगून सोशल मीडियाचा वापर करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.