Tue, Jul 07, 2020 04:51होमपेज › Nashik › जळगाव : आणखी ७ जणांना कोरोनाची बाधा, संख्या ४७५   

जळगाव : आणखी ७ जणांना कोरोनाची बाधा, संख्या ४७५   

Last Updated: May 26 2020 3:15PM
जळगाव : पुढारी वृत्‍तसेवा 

आज जिल्‍ह्यात दुपार पर्यत आलेल्या दोन अहवालांमध्ये 7 कोरोना रूग्ण आढळले आहेत, तर 295 अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याला काहिसा दिलासा मिळाला आहे. 

जळगाव, मुक्ताईनगर, भडगाव, भुसावळ, पाचोरा, अमळनेर, यावल, रावेर येथे स्वॅब घेतलेल्या 302  कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल  नुकतेच  प्राप्त झाले. पहिल्या अहवालात  270 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 3 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगाव, रावेर व अमळनेरच्या प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.

दुसऱ्या अहवालात जळगाव  मधील 29 कोरोना संशयित व्यक्तींच्या तपासणी अहवालात 25 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 4 व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगाव शहरातील दक्षता नगरातील तीन व तांबापुरातील एका व्यक्तीचा समावेश आहे. त्‍यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 475 इतकी झाली आहे.