Mon, Jan 25, 2021 07:08होमपेज › Nashik › ‘निर्भय’पणे जगताही येईना!

‘निर्भय’पणे जगताही येईना!

Published On: Jul 27 2019 1:31AM | Last Updated: Jul 26 2019 11:32PM
नाशिक : प्रतिनिधी

शहरात  . त्यातही धक्‍कादायक बाब म्हणजे अत्याचार करणारे बहुतांशी नात्यातील किंवा ओळखीतीलच होते. त्यामुळे स्त्री वर्गाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. 1 जून ते 24 जुलै या कालावधीत 32 विनयभंगाचे आणि 8 बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी तक्रार क्रमांक, निर्भया पथक, महिला पोलीस, कौटुंबिक तक्रार निवारण केंद्रांचा समावेश आहेत तरीदेखील शहरात चालू वर्षात 1 जानेवारी ते 24 जुलैपर्यंत 32 बलात्कार आणि 119 विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांमध्ये अत्याचार करणारे सर्वाधिक आरोपी हे पीडितेच्या ओळखीचे किंवा नातेसंबंधातीलच आहेत. 1 जून ते 24 जुलै या कालावधीत झालेल्या 32 विनयभंगाच्या गुन्ह्यात 24 आरोपी हे नातेसंबंध, शेजारी किंवा ओळखीचे तसेच सहकारी आहेत तर आठ आरोपी हे पीडितेसाठी अनोळखी होते. त्याचप्रमाणे बलात्काराच्या 8 घटनांमध्ये 4 नातेसंबंधातील आरोपी होते तर 4 जण मित्र, भोंदुबाबा, प्रियकर होते. त्यापैकी एका पीडितेची तिच्याच मामीने विक्री केल्यानंतर इतर संशयितांनी तिच्यावर बलात्कार केल्याचाही प्रकार उघडकीस आला आहे. दाखल गुन्ह्यांनुसार विनयभंगाचे सर्वाधिक प्रकार सकाळच्या सुमारास घडले आहेत. दुपारी 12 पर्यंत 13, दुपारी 12 ते सायंकाळ चार या वेळेत 3, चार ते रात्री 8 या कालावधीत 5 आणि त्यानंतर पहाटे सहापयर्ंत 4 विनयभंगाचे प्रकार घडले आहेत. त्याचप्रमाणे काही संशयितांनी 4 पीडित महिलांचा सोशल मीडियावरून पाठलाग करून विनयभंग केल्याचेही उघडकीस आले आहे. 

पोलीस ठाणेनिहाय गुन्हे (कंसात बलात्काराचे गुन्हे) 

गंगापूर 01 (01), सरकारवाडा 02 (01), आडगाव 01, पंचवटी 01, म्हसरुळ 01, सायबर पोलीस ठाणे 04, अंबड 04, इंदिरानगर 01 (02), नाशिकरोड 03 (01), उपनगर 06 (02), देवळाली कॅम्प 04, सातपूर 03, मुंबई नाका 01 (01)