Connection Error अवैध गर्भपात अर्भक दफन प्रकरणी चौघांना पोलिस कोठडी | पुढारी 
Sun, Jul 12, 2020 19:04होमपेज › Nashik › अवैध गर्भपात अर्भक दफन प्रकरणी चौघांना पोलिस कोठडी

अवैध गर्भपात अर्भक दफन प्रकरणी चौघांना पोलिस कोठडी

Published On: Jan 23 2019 1:05AM | Last Updated: Jan 22 2019 4:33PM
मालेगाव : प्रतिनिधी

कौळाणे शिवारातील एका खोलीत गर्भपात करुन अर्भक ओसाड जागेत पुरण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी दोघां युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यातील आणखीन दोघां आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेत मालेगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यात दोघी महिलाचा सहभाग आहे.  

संगम इश्‍वर देशमुख (वय २१), मानसी अनिल हडावळे (१९), सनी नितीन तुपे (२१) व वैष्णवी सनी तुपे (२०) सर्व रा. भोसली, पुणे अशी आरोपीची नावे आहेत. 

कौळाणे शिवारातील ओसाड जागेत अर्भक पुरण्यात आल्याची घटना सोमवारी (दि.21) उघडकीस आली होती. दुपारच्या सुमारास तीन पुरुष व एक महिला संशयास्पद हालचाली करित असल्याचे वस्तीवरील ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. नागरिक येत असल्याचे पाहून महिला व एक व्यक्‍ती स्कुटीवरुन पसार झाली होती. नागरिकांनी यातील दोघा युवकांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते.

मानसी ही गरोदर होती. तिचा कौळाणे शिवारात डॉ. गोसावी याने बेकायदेशीरपणे गर्भपात केला. यात पवार नामक दलालाने व्यवहार घडविल्याचा प्रकार अर्भक बुजविताना दोघे पकडले गेल्याने उघड झाला होता. यातील डॉक्टर व दलाल फरार आहेत. दाम्पत्यासह प्रेमीयुगुलाला मंगळवारी न्यायाधिश जे. डी. हुशंगाबादे यांच्या कोर्टात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.