Fri, Jun 05, 2020 06:00होमपेज › Nashik › इगतपुरीत शिवसेनेचा तर त्र्यंबकमध्ये भाजपचा ‘भगवा’! 

इगतपुरीत शिवसेनेचा तर त्र्यंबकमध्ये भाजपचा ‘भगवा’! 

Published On: Dec 11 2017 2:15PM | Last Updated: Dec 11 2017 2:15PM

बुकमार्क करा

नाशिक : पुढारी प्रतिनिधी

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत मतदारांनी इगतपुरीत शिवसेना तर त्र्यंबकला भाजपाला स्पष्ट बहुमत दिले. इगतपुरी नगराध्यक्षपदी शिवसेनेचे संजय इंदुलकर विराजमान झाले आहेत.

इगतपुरी नगरपालिकेत 18 पैकी 13 जागांवर शिवसेनेने तर 17 पैकी 14 जागांवर भाजपाने वर्चस्व राखत स्पष्ट बहुमत मिळविले आहे. दोन्ही नगरपालिकांमध्ये दोन्ही पक्षांनी गेल्या अनेक वर्षांपासून आपले  बलस्थान कायम ठेवण्यात यश मिळवले आहे.

इगतपुरी नगरपालिकेतील विजयी उमेदवारांची नावे : युवराज भोंडवे (शिवसेना), अपर्णा धात्रक (भाजपा), किशोर बगाड (शिवसेना), रोशनी परदेशी (शिवसेना), आरती कर्पे (शिवसेना), संपत डावखर (अपक्ष), मीना खातळे (शिवसेना), उमेश कस्तुरे (शिवसेना), साबेरा पवार (भाजपा), दिनेश कोळेकर (भाजपा), उज्वला जगदाळे (शिवसेना), आशा सोनवणे (शिवसेना), गजानन कदम (शिवसेना), सीमा जाधव (शिवसेना), नईम खान (शिवसेना), गीता मेंगाळ (भाजपा), रंगनाथ्लृ चौधरी (शिवसेना).

इगजपुरीत 18 जागैपेकी 13 जागा शिवसेना, भाजपाने चार जागांवर विजयी मिळवला असून, एक जागा अपक्षाच्या खात्यात जमा झाली आहे. तर त्र्यंबकला 17 जागेपैकी भाजपाला 14 जागेवर घवघवीत यश मिळाले असून, शिवसेनेचे दोन तर एक नगरसेवक अपक्ष निवडून आला आहे.

त्र्यंबक नगरपालिकेतील विजयी उमेदवारांची नावे : भारती बदादे (भाजपा), कैलास चोथ्ले (भाजपा), विष्णू दोबाडे (भाजपा), सायली शिखरे (भाजपा), कल्पना लहांगे (शिवसेना), दीपक लोणारी (भाजपा), अशोक घागरे (अपक्ष), त्रिवेणी तुंगार (भाजपा, बिनविरोध), स्वप्निल शेलार (भाजपा), अनिता बागूल (भाजपा), सागर उजे (भाजपा), माधवी भुजंग (भाजपा), शितल उगले (भाजपा), मंगल आराधी (शिवसेना), समीर पाटणकर (भाजपा), संगीता भांगरे (भाजपा) व शिल्पा रामायने (भाजपा).