Sat, Oct 24, 2020 08:40होमपेज › Nashik › 'मी पक्षाला राजीनामा दिलेला नाही'

मी पक्षाला राजीनामा दिलेला नाही : एकनाथ खडसे 

Last Updated: Oct 18 2020 8:02PM

एकनाथ खडसे जळगाव : पुढारी ऑनलाईन 

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार या चर्चांनी गेले काही दिवस राजकारण ढवळून निघाले होते. आज एकनाथ खडसे यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. मी पक्षाला राजीनामा दिला नाही अस भाजप नेते एकनाथ खडसे यांनी म्हटल आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे हे पक्षत्याग करणार असल्याची चर्चा सुरू असताना त्यांनी पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा अधिकृत राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले होते. एकनाथ खडसे भाजपचे प्राथमिक सदस्यत्व सोडले असल्याची बातमी प्रसिध्द झाली होती. त्यानंतर ही बातमी वाचून माझीपण करमणूक झाल्याचे सांगत हे वृत्त त्यांनी नाकारले.

राज्याच्या राजकारणात आपल्या राजकीय कारकीर्दीच्या प्रारंभापासून दबदबा कायम ठेवणाऱ्या राज्यातील निवडक नेत्यांपैकी एकनाथ खडसे एक समजले जातात. महाराष्ट्रात युतीचे सरकार येणे हे अभुतपुर्व सत्तांतर समजले जात होते. युती सरकारच्या मंत्री मंडळात त्यांना अग्रक्रमाने मंत्रीपद मिळालेले होते. त्यानंतरच्या राजकीय घडमोडींमध्ये मिळालेली विधानसभेतील विरोधीपक्ष नेत्याची जबाबदारी त्यांनी चोखपणे सांभाळली. विरोधीनेते म्हणून विधानसभेत आपला आक्रमक पणा त्यांनी त्या काळातील सत्ताधाऱ्यांना दाखवून दिला होता.

गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू आहे. ते घटस्थापनेच्या मुहूर्तावर ती राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली होती. नंतर मात्र अद्यापही त्यांनी याप्रकरणी कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. यामुळे एकनाथ खडसे पक्षांतर करणार की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी आज रविवारी दुपारी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता ते भाजपचा त्याग करणार असल्याचे जवळपास स्पष्ट झालेले आहे. तर आता ते नेमके राष्ट्रवादीत केव्हा प्रवेश करणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. तथापि या वृत्ताला अजूनही एकनाथ खडसे यांच्यातर्फे दुजोरा मिळालेला नाही.
 

 "