Thu, Nov 14, 2019 02:20होमपेज › Nashik › मखमलाबादेत चेंबरमध्ये आढळली मानवी कवटी

मखमलाबादेत चेंबरमध्ये आढळली मानवी कवटी

Published On: Jul 20 2019 2:13AM | Last Updated: Jul 19 2019 11:00PM
पंचवटी : वार्ताहर

मखमलाबाद येथील गोशी नाल्याजवळील चेंबरमध्ये शुक्रवारी (दि. 19) सायंकाळी  महापालिका स्वच्छता कर्मचार्‍यांना मानवी हाडे आणि कवटी सापडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सांडपाण्याच्या नाल्याची साफसफाई करीत असताना चेंबरमध्ये हाडे आणि कवटी पाहून कामगारांचाही क्षणभर थरकाप उडाला. 

त्यांनी घटनेची माहिती म्हसरूळ पोलिसांनी तातडीने कळवली. वरिष्ठ निरीक्षक संजय सांगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. पथकाने हाडांची तपासणी सुरू केली आहे.
रात्री उशिरा सहायक पोलिस आयुक्त सोमनाथ तांबे, फॉरेन्सिक एक्सपर्ट अमित सानप यांनी याप्रकरणात तपासाच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या सूचना केल्या. विविध पोलीस ठाण्यांतील हरवलेल्या व्यक्तींबद्दलच्या तक्रारीशी या हाडांचा संबंध जोडून पाहिला जात आहे. 

लवकरच फॉरेन्सिक अहवाल प्राप्त होईल आणि त्यातूनच  तपासाच्या दृष्टीने धागेदोरे हाती लागतील, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.