Fri, Jul 10, 2020 07:39होमपेज › Nashik › विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी घरमालक महिलेला अटक

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी घरमालक महिलेला अटक

Published On: Aug 02 2019 1:18AM | Last Updated: Aug 02 2019 1:18AM
नाशिक : प्रतिनिधी

बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून अक्षय पंडित साठे (7, रा. संत कबीरनगर) याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.31) सकाळी घडली होती. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी घरमालक महिलेस अटक केली. तिला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

महानगरपालिकेच्या शाळेत शिकणारा अक्षय बुधवारी सकाळी लघुशंकेसाठी गेला होता. त्यावेळी परिसरातील संगीता वाघमारे यांच्या घराचा पाया खोदण्यात आला होता. त्या खड्ड्यात पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज न आल्याने अक्षय त्यात पडला. 

पाण्यात बुडून अक्षयचा मृत्यू झाला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मनपा शिक्षिका मंदा बागूल आणि घरमालक संगीता वाघमारे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.