Tue, Aug 04, 2020 14:31होमपेज › Nashik › नंदुरबार : तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नंदुरबार : तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Last Updated: Jul 16 2020 8:13AM

संग्रहित छायाचित्रनंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

नंदुरबार जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून गुरुवारी पहाटेपर्यंत ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडल्याने वाढलेला प्रचंड उकाडा काही प्रमाणात कमी झाला. दरम्यान, पुढील २० तासांत तापी नदी पात्रातील पाणी पातळीत वाढ होणार असल्याने दोन्ही बॅरेजसची पाणी पातळी नियंत्रणाच्या पातळीपर्यंत कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या २४ तासांसाठी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

वाचा :  माजी मुख्यमंत्र्यांच्या गावच्याच रुग्णालयातील कोविड सेंटरची मान्यता रद्द करण्याची नामुष्की

हतनूर धरणातून सायंकाळी ४ वाजता ६९ हजार क्युसेक विसर्ग होत असून, हा प्रवाह सारंगखेडा बॅरेज येथे १६ जुलै रोजी दुपारी ३ वाजता पोहोचणार असल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील २० तासांत तापी नदी पात्रातील पाणी पातळीत वाढ होणार असल्याने दोन्ही बॅरेजसची पाणी पातळी नियंत्रणाच्या पातळीपर्यंत कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या २४ तासांसाठी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदी काठावर जावू नये. आपली गुर-ढोरे नदीकाठी जावू देऊ नये व नदीकाठी असल्यास सुरक्षित स्थळी हलवावी, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

वाचा : सातारा : तीन बळी; 120 पॉझिटिव्ह