Wed, Jun 03, 2020 20:57होमपेज › Nashik › नंदुरबार : हतनूर धरण भरले; तापीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

नंदुरबार : हतनूर धरण भरले

Published On: Jul 29 2019 5:21PM | Last Updated: Jul 29 2019 6:09PM

संग्रहित छायाचित्रनंदुरबार : प्रतिनिधी 

राज्यात बहुतांशी जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. तर नद्या, नाल्याचे पाणी पात्राबाहेर आले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील हतनूर धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने धरणाचे ३६ गेट पूर्ण उघडून सुमारे ७७ हजार क्युसेक्स प्रवाह तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. यामुळे तापी नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरुच आहे. रविवारी रात्रीपासून सुरू झालेली ही संततधार आजदेखील कायम आहे. नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत ३९९.८३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरी ४४ टक्के इतका पाऊस झाला आहे. हतनूर धरण तर पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणक्षेत्रातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरु आहे. तापी नदीत ७७ हजार क्युसेक्सने पाणी सोडले जात असल्याने तापी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 

पावसाच्या या दमदार हजेरीने मागील दोन महिन्यात निर्माण झालेली पाणीटंचाई दूर होण्याला काही अंशी  हातभार लागला आहे. 

तालुकानिहाय आज झालेल्या पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये : 

नंदुरबार- 15 (327), नवापूर- 70 (480), तळोदा-  23 (477), अक्कलकुवा- 7 (396), शहादा - 24 (354), अक्राणी- 22 (365). एकूण सरासरी- 26.83 (399.83).