Tue, Oct 20, 2020 12:06होमपेज › Nashik › सप्तश्रृंग गडावर आदिमायेच्या दुसऱ्या माळेला उत्साहात प्रारंभ

सप्तश्रृंग गडावर आदिमायेच्या दुसऱ्या माळेला उत्साहात प्रारंभ

Last Updated: Oct 18 2020 5:39PM
सप्तश्रृंगगड :  तुषार बर्डे 

आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तश्रृंगगडावर मंदिरात घटस्थापना होऊन नवरात्रौत्सवाला सुरवात झाली. आज नवरात्रौत्सवातील दुसरी माळ. भगवतीचे नवरात्रीतले देवीचे सुवर्ण अलंकार मंदिरात नेण्यात आले. आजची देवीची पंचामृत महापूजा पुरोहित वर्गाच्या हस्ते करण्यात आली. 

देवीला आज सोन्याचा मुकुट, सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची वज्रटिक, सोन्याची मोहनमाळ, सोन्याचा मयूरहार, सोन्याचा कमरपट्टा, सोन्याचे तोडे, सोन्याची नथ, सोन्याची कर्णफुले, चांदीच्या पादुका ही आभूषणे परिधान केली. सध्या मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण आहे. उणीव जाणवतेय ती भाविकांची.. त्यांच्या आराधनेची..अन देवीच्या जयघोषाची.

मंदिर बंद असल्यामुळे उत्सव साधेपणाने साजरा होत आहे. परंतू पुरोहित वर्गाकडून नित्यपूजा, पाठवाचन, काकडआरती, पंचामृत महापूजा, महानैवेद्य आरती, शांती पाठ, कुंकू मार्चन यांसारखे विधी मंदिरात रोजच सुरू आहेत. भाविक घरबसल्या देवीचे ऑनलाईन दर्शन घेत आहेत. ऑनलाईन दर्शनासाठी भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावेळेस पुरोहित विनोद दिक्षीत, गैरव  देशमुख मिलींद दिक्षीत, भुषण देशमुख ,भागेश दिक्षीत आदी उपस्थितीत होते 

 "