Fri, Jun 05, 2020 04:24होमपेज › Nashik › बालिका खून : आदेशबाबाला मरेपर्यंत जन्मठेप

बालिका खून : आदेशबाबाला मरेपर्यंत जन्मठेप

Published On: Mar 30 2019 5:01PM | Last Updated: Mar 30 2019 5:01PM
जळगाव : प्रतिनिधी 

जळगावमधील समता नगर येथील एका नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्याची घटना घडली आहे.  याबाबत आदेशबाबा उर्फ आनंदा तात्याराव साळुंखे (वय ६३ ) हा दोषी ठरला आहे. शनिवारी  (ता.३०) त्याला जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश गोविंद सानप यांनी दोषी ठरवत मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. 

१२ जून २०१८ रोजी सायंकाळी समतानगरातील धामणवाडा येथून नऊ वर्षीय बालिकेचे अपहरण केले. यानंतर तिचा खून करून  मृतदेह पोत्यात घालून टेकडीवरुन फेकून पोबारा केला होता. न्यायालयात त्याच्याविरुद्ध खटला सुरु होता. यात आदेशबाबा दोषी आढळून आला . त्याला  शनिवार (ता.३०)  शिक्षा सुनावण्यात आली. न्यायाधीश गोविंद सानप यांच्या न्यायालयात हा खटला सुरु होता. यात एकूण २७ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादीतर्फे एस. के. कौल यांनी तर सरकार पक्षतर्फे केतन ढाके यांनी काम पहिले.

दरम्यान सरकारी वकील केतन ढाके यांनी फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप सुनावल्याने निकालावर समाधान व्यक्त करीत फिर्यादीला न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया दिली. पीडितेच्या आईने आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

या कलमांनुसार झाली शिक्षा

कलम ३६३ नुसार सक्षम कारावास , २५ हजार रुपये दंड , कलम ३७६/३ नुसार मरेपर्यंत जन्मठेप -२५ हजारांचा दंड, दंड न भरल्यास दोन महिन्यांची शिक्षा, ३७६/अ मरेपर्यंत जन्मठेप , कलम ३०२ नुसार जन्मठेप , कलम २०१ नुसार पाच वर्ष शिक्षा, पॉस्को ६ मध्ये ६ वर्ष शिक्षा २५ हजार दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.