Fri, Jun 05, 2020 14:50
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › जळगाव : घरकुल घोटाळा प्रकरणात आता 27 जुनला निकाल

जळगाव : घरकुल घोटाळा प्रकरणात आता 27 जुनला निकाल

Published On: Jun 07 2019 10:55AM | Last Updated: Jun 07 2019 11:06AM
धुळे : प्रतिनिधी 

जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणाचा निकाल आज (ता.७)  लागण्याची शक्यता आहे. या खटल्याकडे देशभराचे लक्ष लागून आहे. या प्रकरणात माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह 53 आरोपींच्या भविष्यावर आज या निकालातून परिणाम होणार आहे.

धुळ्यातील विशेष न्यायालयाचे विशेष न्यायाधीश सृष्टी नीलकंठ यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या खटल्याचे कामकाज संपल्याने निकाल लागण्याची शक्यता आहे, जळगावात 9 ठिकाणी घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी  योजना राबविण्यात आली. यामध्ये 1997 ते 2001 या दरम्यान 45 कोटी रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार तत्कालिन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्याने हा गुन्हा दाखल झाला. 

सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशाने हा खटला धुळे न्यायालयात वर्ग करण्यात आला. त्यासाठी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांची व विजय रवंडले, विकास पगारे यांची देखील नियुक्ती झाली.