होमपेज › Nashik › नाशिकमध्ये साकारले गांधीजींचे धातुशिल्प video

नाशिकमध्ये साकारले गांधीजींचे धातुशिल्प video

Published On: Oct 02 2019 6:29PM | Last Updated: Oct 02 2019 7:33PM
नाशिक : पुढारी प्रतिनिधी

महात्मा गांधींच्या १५०व्या जयंती वर्षानिमित्त इस्पॅलिअर हेरिटेज स्कूलमध्ये गांधीजींचे गांधी स्तंभ धातुशिल्प साकारण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांच्या शिल्पाच्या धर्तीवर हे शिल्प तयार करण्यात आले. 

इस्पॅलिअर स्कूलचे संचालक सचिन जोशी यांच्या संकल्पनेतून तर कलावंत श्याम लोंढे यांच्या कला दिग्दर्शनातून हे शिल्प बनवण्यात आले आहे. शिल्प अन्य पारंपरिक शिल्पांप्रमाणे नाही. गांधीजींनी ‘नई तालीम’ शिक्षणप्रणालीतील सांगितलेल्या 30 तत्त्वांचे प्रतीक म्हणून केवळ 30 लोखंडी पाइप विशिष्ट पद्धतीने मांडल्या आहेत.  

ते दुरून पाहिल्यास नजरेच्या विशिष्ट टप्प्यात आल्यावर त्यांत महात्मा गांधींची छबी दिसते. या लोखंडी कॉलमची उंची 20 फूट असून, एकूण शिल्पाची रुंदी 18 फूट आहे. ते तयार करण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी लागला आहे. शिल्पाची जमिनीपासून उंची 25 फूट आहे. 2 ऑक्टोबर रोजी हे शिल्प नाशिककरांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले. ते पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.