होमपेज › Nashik › फ्यूनिक्युलर ट्रॉलीच्या लोकार्पणाला मुहूर्त लागणार

फ्यूनिक्युलर ट्रॉलीच्या लोकार्पणाला मुहूर्त लागणार

Published On: Jun 29 2018 12:05AM | Last Updated: Jun 28 2018 11:32PMनाशिक : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या मंगळवारी (दि.3) सप्तशृंगगडावरील फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे लोकार्पण होणार असल्याचे समजते.

मुख्यमंत्री नाशिक दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात सप्तशृंगगडावर देशातील पहिल्या फ्यूनिक्युलर ट्रॉलीच्या प्रकल्पाचे लोकार्पण केले जाणार असल्याचे समजते. त्यादृष्टीने मुख्यमंत्री कार्यालयाने जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी अहवाल मागविला आहे. त्यामुळेच ट्रॉलीच्या मार्गातील अडथळे दूर होणार आहेत. दरम्यानच्या काळात विधान परिषद आचारसंहितेमुळे ट्रॉलीचे उद्घाटन रखडले होते.

नाशिक शिक्षक मतदारसंघाचा निकाल गुरुवारी (दि.28) लागला असून, आचारसंहिता शिथिल झाली आहे. त्यामुळेच ट्रॉलीचे रखडलेले उद्घाटन करून घेण्यासाठी आता मुख्यमंत्री कार्यालयानेच पुढाकार घेतला आहे. परिणामी जुलैच्या पहिल्या आठवड्यात ट्रॉली भक्तांच्या सेवेत दाखल होईल.