होमपेज › Nashik › नाशिक : गावठी कट्टा आणि तलवारीसह चार तरूणांना अटक

नाशिक : गावठी कट्टा आणि तलवारीसह चार तरूणांना अटक

Published On: Apr 29 2018 7:35AM | Last Updated: Apr 29 2018 7:35AMनाशिकरोड : वार्ताहर 

देवळाली गावात दोन तलवारी आणि दोन गावठी कट्टा वापरणाऱ्या चार संशयित तरुणांना पोलिसांनी गुप्त महितीच्या आधारे ताब्यात घेतले. यात एका शिवसेना नेत्याच्या मुलाचा समावेश असल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, पोलिस निरीक्षक बीजली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी उत्तम दळवी , प्रकाश भालेराव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी साफळा रचून शनिवारी सायंकाळी ही कारवाई केली. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चार तरुणांमध्ये एका शिवसेनेच्या बड्या नेत्याचा मुलगा असल्याचे बोलले जात आहे. नाशिक पूर्व मतदार संघात शिवसेनेकडून उमेदवारी करणारे सूर्यकांत लवटे उर्फ राजु अण्णा लवटे यांचा मुलगा संदेश लवटे याचा संशयित तरुणांमध्ये समावेश असल्याची चर्चा असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर याबाबत अधिक माहिती समोर येईल.

Tags : nashik district nashikrood,  youth, pistols,  sword