Mon, Nov 30, 2020 12:54होमपेज › Nashik › नाशिक : चार बिबट्यांना केलं जेरबंद

नाशिक : वन विभागाने चार बिबट्यांना केले जेरबंद

Last Updated: Oct 24 2020 7:40PM

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे जेरबंद करण्यात आलेले बिबटे.नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील कोराटे रस्त्यालगत असलेल्या कणेरी नाल्यालगतील शेतात चार बिटट्यांना पकडण्यात आले आहे. अरुण मुरलीधर तिडके यांच्या शेतात पिंजरे ठेवण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांत चार बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. या बिबट्यांची माता असलेली मादी बिबट्या अजुनही परिसरात फिरत असल्याने वनविभागातर्फे या मादीला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला, अशी माहिती वन विभागातर्फे देण्यात आली.

परवा एका बिबट्याचा बछडा पिंजऱ्यात अडकला होता. त्यानंतर काल आणखी एक बिबट्या पुन्हा पिंजऱ्यात अडकला. काल रात्री त्याच पिंजर्‍यात आणखी दोन बछडे अडकल्याचे परिसरातील नागरिकांना समजले. यावेळी बछड्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. याअगोदर सापडलेल्या दोन्ही बछड्यांना वनविभागाच्या पांडवलेणी येथील उद्यानात ठेवण्यात आले. आज जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्यांच्या बछड्यांना त्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. त्यांची माता मादी बिबट्या अजुनही परिसरात फिरत असल्याने शेतकरी वर्गात मोठे चिंतेचे वातावरण आहे. या मादीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे पथक परिसरात कार्यरत आहे अशी माहिती दिंडोरी वन विभागाकडून देण्यात आली आहे.

या पथकामध्ये दिंडोरी वन विभागाचे अधिकारी गणेश गांगोडे, वनक्षेत्रपाल वैभव गायकवाड आदींसह वनविभागाचे कर्मचारी कार्यरत आहेत.

वाचा :नंदुरबार : दुर्गम भागातील पॅनकार्ड वापरून कोटींचे घोटाळे

वाचा :नंदुरबार : एकतर्फी प्रेमातून १० वीत शिकणाऱ्या मुलीची गळा चिरून हत्या