Fri, Jul 10, 2020 07:41होमपेज › Nashik › आ. घोलप यांच्यासह चौघांचे अर्ज दाखल

आ. घोलप यांच्यासह चौघांचे अर्ज दाखल

Published On: Oct 04 2019 1:49AM | Last Updated: Oct 03 2019 10:50PM
नाशिकरोड  : वार्ताहर

देवळाली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीचे उमेदवार आ. योगेश घोलप यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे गौतम वाघ, बहुजन समाज पार्टीचे अ‍ॅड. अमोल पठाडे आणि अ‍ॅड. परमदेव आहिरराव यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या चारही उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश श्रींगी यांच्याकडे अर्ज दाखल केले. दरम्यान, भाजपाला सोडचिठ्ठी देत नगरसेविका सरोज अहिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळविली आहे. 

आ. घोलप यांचा अर्ज दाखल करण्यासाठी संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, माजी मंत्री बबन घोलप, खासदार हेमंत गोडसे,  जिल्हाप्रमुख विजय करजंकर, भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. तत्पूर्वी आ. योगेश घोलप यांनी गुरुवारी (दि.3) सकाळी भगूर येथील रेणुकामाता  मंदिरात महापूजा व आरती करून दर्शन घेतले. येथूनच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅलीस सुरुवात झाली. भगूर, देवळाली कॅम्प, लॅमरोडने विहितगाव, देवळाली गाव परिसरातून नाशिकरोड दुर्गामाता मंदिराजवळ रॅलीची सांगता झाली. ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत व आ. घोलप यांचे औक्षण करण्यात आले. रॅलीत  नगरसेवक शिवाजी चुंभळे, उपजिल्हाप्रमुख जगन आगळे, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, महानगरप्रमुख सचिन मराठे, विधानसभाप्रमुख केशव पोरजे, नगरसेवक सूर्यकांत लवटे,  अजय बोरस्ते, तानाजी गायधनी, भाजपा तालुकाध्यक्ष तानाजी करजंकर, जीवन गायकवाड, दत्ता सजगुरे, रमेश धोंगडे, योगेश म्हस्के, अनिल ढिकले, शिरीष लवटे, युवासेना जिल्हाप्रमुख राहुल ताजनपुरे, संजय तुंगार, राजाभाऊ फोकणे, नितीन चिडे, योगेश देशमुख आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीकडून गौतम वाघ यांनी तसेच, बहुजन समाज पार्टीचे अमोल पठाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी देवीदास आबालिकार, डॉ. संतोष अहिरे, चंद्रकांत साळवे,नामदेव घोलप आदी उपस्थित होते.