Tue, Nov 19, 2019 05:02होमपेज › Nashik › माजी मंत्री सुरेश जैन नाशिक कारागृहात

माजी मंत्री सुरेश जैन नाशिक कारागृहात

Published On: Sep 04 2019 1:55AM | Last Updated: Sep 04 2019 12:37AM
धुळे /नाशिकरोड : प्रतिनिधी

जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात शिक्षा झालेल्या माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासह 38 आरोपींना धुळे येथून नाशिकच्या कारागृहात हलविण्यात आले. धुळे कारागृहातून जाताना आरोपींना भेटण्यासाठी कारागृहाबाहेर मोठी गर्दी झाली होती. पण पोलिसांनी बंदोबस्तामुळे या आरोपींना पिंजरा गाडीत बसवून नाशिककडे प्रयाण केले. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह दहा जणांना उपचारासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. यातील सर्व आरोपींनी निकालाला आव्हान देण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे. 

गुलाबराव देवकर यांच्यासह दहा जणांवर धुळ्यात उपचार

जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात शिक्षा झालेल्या माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासह इतर आरोपींना धुळे येथून नाशिकच्या कारागृहात हलविण्यात आले आहे. यावेळी त्यांना भेटण्यासाठी धुळे कारागृहाबाहेर मोठी गर्दी झाली होती. पण पोलिसांनी बंदोबस्तामुळे या आरोपींना पिंजरा गाडीत बसवून नाशिककडे प्रयाण केले. यावेळी नातेवाइकांनी रस्त्यावरच आक्रोश केला. तर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह दहा जणांना उपचारासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. यातील सर्व आरोपींनी निकालाला आव्हान देण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे.

जळगाव येथे घरकुलांच्या कामात कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर धुळ्यातील विशेष न्यायालयाने शनिवारी घोटाळा प्रकरणात प्रमुख आरोपी माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह सर्व आरोपींना दोषी धरत सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली आहे. यानंतर या आरोपींना धुळे येथील कारागृहात रवाना करण्यात आले होतेे. तर प्रकृतीच्या कारणास्तव दहा जणांना उपचारासाठी दाखल केले होते. यात पाच महिलांचा समावेश आहे. दरम्यान, उर्वरित आरोपींना मंगळवारी (दि.3) दोन मोठ्या पोलीस वाहनांतून नाशिक कारागृहात हलवण्यात आले आहे. यावेळी कारागृहाच्या बाहेर मोठी गर्दी गोळा झाली होतीआरोपींच्या नातेवाइकांनी आरोपींना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे नातेवाईकांची एकच आक्रोश केला होता. 

आरोपी नाशिक कारागृहात दाखल

आरोपींची वाहने दुपारी पावणेचार वाजता नाशिकरोड कारागृहात दाखल झाले. माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासह आमदार चंद्रकांत सोनवणे व इतर 37 आरोपींना या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. नाशिकरोड कारागृहात सुमारे तीन हजार कैदी आहेत. त्यात या 38 जणांची भर पडली आहे. जैन यांना कारागृहात आणणार असल्याने प्रसारमाध्यमांसह जैन समर्थकांची गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. 38 दोषींमध्ये दहा महिला आहेत. यावेळी परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. चंद्रकांत सोनवणे हे आमदार असल्याने विधानसभा अध्यक्षांना त्यांच्याबाबत अहवाल पाठविण्यात येणार आहे.