Tue, Jun 02, 2020 12:45होमपेज › Nashik › माजी मंत्री हेमंत देशमुख यांना पोलीस कोठडी

माजी मंत्री हेमंत देशमुख यांना पोलीस कोठडी

Published On: Jul 24 2019 1:40AM | Last Updated: Jul 24 2019 1:40AM
धुळे : प्रतिनिधी

दोंडाईचा येथील घरकुल घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेले माजी राज्यमंत्री डॉ. हेमंत देशमुख यांना मंगळवारी न्यायालयाने 26 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी डॉ. देशमुख यांनी स्वतः न्यायालयासमोर प्रकृती अस्वस्थतेचे कारण सांगून उपचाराची मदत मागितल्याने न्यायालयाने तपास यंत्रणेला योग्य वैद्यकीय मदत पुरविण्याचे आदेश दिले.

दोंडाईचा घरकुल घोटाळा प्रकरणात सोमवारी रात्री उशिरा माजी मंत्री डॉ. देशमुख यांना अटक करण्यात आली. यानंतर तपास अधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ तसेच गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी डॉ. देशमुख यांना न्यायालयात हजर केले. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. देवेंद्रसिंह तंवर यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. घरकुलांचे बांधकामात गैरव्यवहार प्रकरणी माजी मंत्री देशमुख यांना सोमवारी न्यायालयाने अटकपूर्व जामिन अर्ज नाकारल्यानंतर लगेचच अटक झाली होती.