Sun, Jul 12, 2020 17:54होमपेज › Nashik › माजी मंत्री हेमंत देशमुख यांना धुळ्यात अटक

माजी मंत्री हेमंत देशमुख यांना धुळ्यात अटक

Published On: Jul 23 2019 1:18AM | Last Updated: Jul 22 2019 10:59PM
धुळे : प्रतिनिधी

दोंडाईचा येथे घरकुल योजनेत गैरप्रकार केल्याचा आरोप असणारे माजीमंत्री हेमंत देशमुख यांचा अटकपूर्व जामीन धुळ्यातील सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्यांना काही वेळातच अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी दिली.

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथेे नगरपालिकेच्या माध्यमातून माजी मंत्री हेमंत देशमुख यांनी घरकुल योजना राबवली. यात वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे 3 हजार 700 घरकुलांचे बांधकाम करण्यात आले. मात्र, या कामात गैरप्रकार झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात झाली आहे. त्यानुसार गुन्हाही दाखल आहेे. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आल आहे. दरम्यान, हेमंत देशमुख यांनी अटकपूर्व जामिनासाठी धुळे न्यायालयात अर्ज केला असता न्यायाधीश एस. आर. उगले यांना अटकपूर्व जामीन अर्ज नाकारला आहे. त्यानंतर काही वेळातच त्यांना धुळे पोलिसांनी अटक केली. दरम्यान, घरकुल योजना राबविताना कायदेशीर प्रक्रिया राबविली गेली नाही. तसेच, या कामासाठी एका 

त्रि-सदस्यीय समितीचे गठण करण्यात आले होते. यात हेमंत देशमुख व गिरधारीलाल रामरख्या यांचा समावेश होता. त्यामुळे गैरप्रकारात देशमुख यांचा सहभाग प्रथमदर्शी दिसत असल्याचा युक्तिवाद करण्यात न्यायालयात करण्यात आला होता.