Fri, Aug 07, 2020 15:38होमपेज › Nashik › तलवारी मिरवून दहशत पसरविणार्‍यांना अटक

तलवारी मिरवून दहशत पसरविणार्‍यांना अटक

Published On: Jul 09 2018 1:04AM | Last Updated: Jul 08 2018 11:29PMमालेगाव : वार्ताहर

शहरातील आझादनगर भागातील अली अकबर रुग्णालय, फिरदोस गंज, सनाउल्लानगर, रौनकाबाद, मदनीनगर व मिरादातारनगर आदी भागांत दुचाकीवरून विविध प्रमुख रस्त्यांवर तलवारी मिरवून दहशत निर्माण करणार्‍या शरीफ अहमद ऊर्फ शरीफ मस्सा (वय 34), इरफान अहमद ऊर्फ राजू चिच्या (32), आकिब अहमद ऊर्फ पागल (23, तिघे रा. फिरदोसगंज), इम्तियाज अहमद ऊर्फ इम्तियाज गोली (40, म्हाळदे शिवार) व आबीद अहमद अफजल (वय 30, रा. पवारवाडी) या पाच संशयितांना अटक केली. 

शुक्रवारी (ता. 6) रात्री सव्वाबाराच्या सुमारास सापळा रचून पवारवाडी पोलिसांनी ही कारवाई केली. अटक केलेल्या संशयितांकडून दोन दुचाकी, तीन तलवारी व रोख तीन हजार रुपये, असा 63 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला. 

आझादनगर भागात 27 जुलैला संशयितांनी दुचाकीवर तलवारी मिरवून दहशत व लूटमार करण्याचा प्रयत्न केला होता. या संशयितांची सीसीटीव्ही फुटेजवरून ओळख पटली होती. यानंतर अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपअधीक्षक रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सचिन वांगडे, उपनिरीक्षक जारवाल, हवालदार बाविस्कर, राजेंद्र पगारे, पोलिस नाईक भरत गांगुर्डे, अंबादास डामसे, राकेश जाधव, नवनाथ शेलार, महेंद्र पारधी आदींनी सदर कारवाई केली.