Mon, Nov 18, 2019 19:57होमपेज › Nashik › 'एलओसी' पार केलेल्या जवान चंदू चव्हाणांविरोधात गुन्हा दाखल 

'एलओसी' पार केलेल्या जवान चंदू चव्हाणांविरोधात गुन्हा दाखल 

Published On: Apr 28 2019 8:39PM | Last Updated: Apr 28 2019 8:41PM
धुळे : प्रतिनिधी  

भारतीय सुरक्षा दलातील जवान आणि एलओसी पार करून चर्चेत आलेल्या चंदू चव्हाण यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तथा संरक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे यांचा सोशल मीडियावरून प्रचार केल्याने गुन्हा दाखल झाला आहे. 

आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या तक्रारीवरून चौकशी करून प्रशासनाने हा गुन्हा दाखल झाला आहे. धुळे लोकसभेचे उमेदवार तथा देशाचे संरक्षण राज्य मंत्री डॉ सुभाष भामरे यांचा प्रचार करणे जवान चंदू चव्हाण यांना चांगलेच महागात पडले आहे. या संदर्भात आमदार अनिल गोटे यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली. यात चव्हाण यांच्या फेसबुक अकाउंटवरून प्रचार पोस्ट टाकल्याची तक्रार होती.

त्यानुसार जिल्हा निवडणूक विभागाने चौकशी करून पोलीस ठाण्यात तक्रार केली. अभिनव पवार यांनी तक्रार दिली. चव्हाण हे सैनिक म्हणून सुरक्षा विभागात शासकीय नोकरीवर असताना त्यांच्या सोशल मीडियावरून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ सुभाष भामरे यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले, असे तक्रारीत नमूद केले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला.