Tue, May 26, 2020 12:17होमपेज › Nashik › लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसावर गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; पोलिसावर गुन्हा

Published On: Mar 23 2019 9:34AM | Last Updated: Mar 23 2019 9:34AM
जळगाव: पुढारी ऑनलाईन

यावल  तालुक्यातील एका पोलिस कॉन्स्टेबलने वाघझीरा येथील २५ वर्षीय आदिवासी युवतीस लग्नाचे आमिष दाखवून सुमारे अडीच वर्ष तिच्यावर अत्याचार करीत तिची फसवूणक केली असल्याची घटना समोर आली आहे.  या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कॉन्स्टेबलचे नाव इरफान अकबर तडवी असे असून तो यावल पोलिसात नंदुरबार पोलिस मुख्यालयात कार्यरत आहे. 

कशी झाली ओळख

यावल तालुक्यातील वाघझीरा येथील २५ वर्षीय युवतीने येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, वाघझीरा आश्रम शाळेत इयत्ता १२ वीपर्यंत शिक्षण घेत असताना वाघाझिरा गावातीलच इरफान अकबर तडवी व मी वर्गमित्र होतो. त्यानंतरच्या काळात किनगाव येथे डी. एड करीत असताना त्याने माझ्याकडून माझा मोबाईल नंबर घेवून त्याने प्रेमाचे व लग्नाचे आमिष दाखविले आणि त्यास मी बळी पडले.

त्यानंतर काय काय घडत गेले

एप्रिल २०१७ मध्ये पीडीत ही पोलिस भरतीसाठी नंदूरबार येथे गेली असता त्यावेळी इरफान तडवी हा गावापासून तिच्या सोबत बसमध्ये होता व नंदुरबार बसस्थानकावर उतरल्यानंतर त्याने प्रेमाचे आमिष दाखवत गौरव पॅलेस या लॉजवर नेले व अत्याचार केला. त्यानंतर १ जुन रोजी जळगाव येथे पीडीत तरूणीची डी. एड ची परीक्षा असतांना १० दिवस त्याने वारंवार जळगाव येथील स्टेशनरोडवरील देव हॉटेल येथे तसेच जानेवारी १९ पर्यंत यावल तालुक्यातील मोर धरण परीसर, आडगाव व हिंगोणा परिसरात वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला.

दरम्यानच्या काळात ती गर्भवती राहिली व पीडीताचे इतर दुसऱ्या ठिकाणी लग्न ठरून विवाह झाला मात्र, ती गर्भवती असल्याने विवाहानंतर लगेच माहेरी आली व नतर सासरी न जाता नंदुरबार पोलीस मुख्यालय पोलिस कॉन्स्टेबल म्हणून नोकरीस असलेल्या इरफान अकबर तडवी कडे गेली. तेव्हा त्याने पीडीतास जळगाव येथील एका रुग्णालयात नेवून गर्भपात करवून घेतला.

एकूणच २०१६ ते जानेवारी २०१९ या दरम्यान त्यांने पीडीतावर लग्नाचे आमिष व बदनामीची भिती दाखवून अत्याचार करून व लग्न न करता तिची फसवणूक केल्याचे तरूणीने फिर्यादीत म्हटले आहे. तिच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात अत्याचारासह फसवणूकसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पुढील तपास पोलिस निरिक्षक डी. के. परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर, हवालदार संजय तायडे करीत आहेत. सदरील पिडीत तरूणीला तिचे झालेले लग्न मोडायला लावले व तिला पुन्हा विश्वासात घेतले आणी तिचा गर्भपात केला आणी तरी देखील लग्न केले नाही. असे असताना स्वत:हा करीता लग्नासाठी मुलगी शोधत असल्याचे पीडिताच्या लक्षात आल्यावर आपली फसवणूक झाल्याची खात्री झाली व गुन्हा दाखल केला.