Mon, Nov 18, 2019 08:36होमपेज › Nashik › सिल्लोडमध्ये साकारणार शिवरायांचा पुतळा

सिल्लोडमध्ये साकारणार शिवरायांचा पुतळा

Published On: Sep 16 2019 8:02PM | Last Updated: Sep 16 2019 8:02PM
सिल्लोड : प्रतिनिधी 

सिल्लोड शहर हद्दीमध्ये औरंगाबाद रोडवरील बायपासच्या चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 51 फूट उंचीचा नवीन अश्वरूढ पुतळा नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात येणार आहे. यासाठी नगर परिषदेमध्ये ठराव पारित करण्यात आला असून यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 5 कोटी रुपयांचा विशेष निधीची मागणी करण्यात येणार आहे. तर यासाठी अब्दुल सत्तार यांच्या निधीतून 1 कोटी निधी देण्यात येणार आहे. या निधीतून लवकरच कामाला सुरुवात होईल अशी माहिती माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश करून एक आठवडा पूर्ण होत नाही, तोच हा ऐतिहासिक निर्णय घेतला. ज्या भागात हा पुतळा उभारण्यात येणार आहे, तो रस्ता जगप्रसिद्ध अजिंठा लेणीकडे जातो. यामुळे साहजिकच देश विदेशातील पर्यटनाच्या नजरी हा पुतळा लक्ष वेधेल. याच ठिकाणी देश विदेशातील पर्यटकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील मराठी, हिंदी साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

यावेळी नगराध्यक्षा राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, गटनेता नंदकिशोर सहारे यांच्यासह सर्व सन्माननीय नगर सेवकांची उपस्थिती होती.