Fri, Jun 05, 2020 13:51होमपेज › Nashik › गावितांविरोधात सर्वपक्षीयांचा एल्गार

गावितांविरोधात सर्वपक्षीयांचा एल्गार

Published On: Sep 03 2019 1:45AM | Last Updated: Sep 02 2019 10:19PM
त्र्यंबकेश्वर : वार्ताहर

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार निर्मला गावित यांच्या पक्षांतरानंतर तीन माजी आमदार,  सहा आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पाच आजी-माजी सभापतींसह शेकडो कार्यकर्ते गावितांच्या उमेदवारीला विरोध करीत आहे.

त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या बैठकीत येत्या विधानसभेसाठी आमदार गावितांनी कोणत्याही पक्षांकडून उमेदवारी केल्यास दोन्ही तालुक्यांतून सर्वानुमते एकच उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला. याच बैठकीत ‘गावित हटाव, आता भूमिपुत्र आमदार’ असा नाराही देण्यात आला. यावेळी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, माजी आमदार शिवराम झोले, माजी आमदार पांडुरंग गांगड, माजी सभापती गोपाळ लहांगे, ज्येष्ठ नेते मधुकर लांडे, अरुण मेढे, हरिभाऊ बोडके, जिल्हा नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर, भाजपा नेते भाऊराव डगळे, जिल्हा परिषद सदस्य हिरामण खोसकर, जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे, संतोष डगळे, माजी सभापती मोतीराम दिवे, माजी सभापती पांडुरंग झोले आदी उपस्थित होते.

दरम्यान, दोन वर्षांपासून शिवसेनेकडून उमेदवारीची तयारी करीत असलेले माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनाच उमेदवारी देण्याची मागणी सर्वपक्षीयांकडून इच्छुक उमेदवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे हिरामण खोसकर यांनी सांगितले. यापुढे दोन्ही तालुक्यांत दौरा करून गावित यांनी केलेल्या कथित भ्रष्टाचारासंबंधी जनजागृती करण्यात येणार असल्याचे लहांगे यांनी सांगितले. मेंगाळ यांनी गावितांनी केलेल्या भ्रष्टाचारावर शरसंधान साधत येणार्‍या निवडणुकीत पराभव दिसत असल्यानेच पक्ष बदल केला असल्याची टीका केली. यावेळी नगरसेवक सागर उजे, ज्येष्ठ नेते विष्णू आचारी, विष्णू खाडे, कमळू कडाळी, पुंडलिक साबळे, सरपंच राजू बदादे, शांताराम झोले, पांडुरंग आचारी, भाऊराव डगळे, लालू आचारी, काशीनाथ वारघडे, उपसभापती मधुकर झोले, मोहन भांगरे, माजी सभापती देवराम भस्मे, नगरसेवक बंडू खोडे, संतोष रोंदळे, हिरामण कौंटे, जयराम मोंढे, कमळू कडाळी आदी उपस्थित होते.