Sat, Oct 24, 2020 08:29



होमपेज › Nashik › एकनाथ खडसे यांचा भाजप सदस्यत्वाचा राजीनामा?

एकनाथ खडसे यांचा भाजप सदस्यत्वाचा राजीनामा?

Last Updated: Oct 18 2020 11:50PM




जळगाव : पुढारी वृत्तसेवा

गेल्या अनेक दिवसांपासून माजी मंत्री एकनाथ खडसे हे भाजप पक्षाचा त्याग करणार असल्याची चर्चा सुरू असताना त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले आहे.  यासंदर्भात बातमीदेखील प्रसिद्ध झाली आहे. मात्र, खुद्द खडसे यांनी यामुळे माझी करमणूक झाल्याचे सांगत राजीनाम्याचे वृत्त नाकारले आहे.

राज्याच्या राजकारणात दबदबा कायम ठेवणार्‍या निवडक नेत्यांपैकी खडसे मानले जातात. गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजप पक्षाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातही घटस्थापनेच्या मुहूर्तावर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, अद्यापही त्यांनी याप्रकरणी कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. यामुळे खडसे पक्षांतर करणार की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

या पार्श्‍वभूमीवर खडसे यांनी रविवारी दुपारी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता ते भाजपचा त्याग करणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. आता ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार का याकडे लक्ष लागले आहे. तथापि, या वृत्ताला अजूनही खडसे यांनी दुजोरा दिलेला नसल्याचा संभ—म कायम आहे.





 







"