Tue, Jun 02, 2020 14:56होमपेज › Nashik › शिक्षण विस्तार अधिकारी लाच घेताना जाळ्यात 

शिक्षण विस्तार अधिकारी लाच घेताना जाळ्यात 

Published On: Apr 21 2018 6:26PM | Last Updated: Apr 21 2018 6:26PMजळगावः प्रतिनिधी

शाळेच्या वार्षिक तपासणीचा अनुकूल अभिप्राय देणे व वैद्यकीय बिल मंजुरीच्या शिफारशीसाठी 3 हजार रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी मुक्ताईनगर येथील शिक्षण विस्तार अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील एका शिक्षकाने याबाबत तक्रार दिली होती. 

याबाबत अधिक माहिती अशी, शाळेच्या वार्षिक तपासणीला आणि वैद्यकीय बिल मंजुरी शिफारशीला अनुकूल अभिप्राय दिला म्हणून मुक्ताईनगर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी जगतसिंग दगडू पाटील ( 38 रा. प्लॉट नं.38/2 राम निवास जानकी नगर जळगाव ) यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. जगतसिंग पाटील यांनी 3500 रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र तडजोडी अंती 3 हजार रूपये देण्याचे ठरले होते. आज पंचायत समिती कार्यालयात लाच घेताना दुपारी 3.30 वाजता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले. यामुळे शिक्षण खात्यात एकच खळबळ उडाली आहे. 

Tags : Education Extension Officer, bribe, nashik news