Fri, Jun 05, 2020 05:36होमपेज › Nashik › अंजनेरी येथे विहिरीत बुडून मुलीचा मृत्यू

अंजनेरी येथे विहिरीत बुडून मुलीचा मृत्यू

Published On: Jul 22 2019 2:03AM | Last Updated: Jul 21 2019 11:41PM
नाशिक :

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथे कपडे धुण्यासाठी गेलेल्या सोळा वर्षीय मुलीचा तोल जाऊन विहिरीत पडल्याने बुडून तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पूजा सुनील लहानगे असे मुलीचे नाव आहे. पूजा शनिवारी (दि. 20) दुपारी 4.30 च्या सुमारास मळ्यातील विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. यावेळी तिचा तोल जाऊन ती विहिरीत पडल्याने बुडाली. तिचे चुलते ताराचंद यशवंत लहानगे यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच पूजाची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.